शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

मौसम मस्ताना! तर्राट वाहनचालक सुसाट

By नारायण बडगुजर | Published: July 13, 2022 11:54 AM

मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत अडचणी...

पिंपरी : काय पाऊस, काय वातावरण अन् काय मौसम, समदं कसं ओक्केमध्ये आहे, असे म्हणत काही तळीरामांकडून तसेच हौशींकडूनही मद्य पार्ट्या होत आहेत. मौसम मस्ताना, फोन कर बसताना, असे म्हणत यात काही शौकीनही सहभागी होत आहेत. यातील काही जण मद्यापान करून वाहन चालिवतात. ब्रिथ ॲनलायझरचा वापर होत नसल्याने अशा मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत अडचणी येत आहेत. परिणामी असे चालक सुसाट आहेत.  

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर धडाकेबाज कारवाई होत आहे. कोरोना महामारीमुळे ब्रिथ ॲनलायझरच्या वापरावर निर्बंध होते. त्याचा पुन्हा वापर करावा किंवा नाही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे सध्या वापर होत नाही. ‘आली लहर केला कहर’, असे वागणाऱ्या वाहनचालकांचे त्यामुळे फावले आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून साडेतीन वर्षात २१८५४ मद्यपी वाहनचालकांवर खटले दाखल झाले. यात २०१९ मध्ये या एकाच वर्षात दाखल झालेल्या २०९४३ खटल्यांचा समावेश आहे.

‘ब्रिथ ॲनलायझर’चा वापर बंदवाहनचालकाने मद्यपान केले आहे किंवा नाही यासाठी ‘ब्रिथ ॲनलायझर’व्दारे तपासणी केली जाते. ‘ब्रिथ ॲनलायझर’मध्ये श्वास सोडून त्यातून अल्कोहोल तपासले जाते. श्वासात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आल्यास संबंधित वाहन चालकाने मद्यपान केले असल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते. यात थेट श्वासोच्छवास तपासला जात असल्याने ब्रिथ ॲनलायझरला वाहनचालकांकडून विरोध करण्यात येतो. तसेच संसर्गाची शक्यता असल्याने ब्रिथ ॲनलायझरचा वापर सध्या बंद आहे. तसे आदेशही वाहतूक पोलिसांना दिले होते.  

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवकर दाखल केलेल खटले :महिना -          २०१९ - २०२० - २०२१ - २०२२जानेवारी -            ०० -  २१० - २२ - ००फेब्रुवारी -            २२६ -  ४१५ - ०० - ००मार्च -                  १९७ - १६६ - ३८ - ०८एप्रिल -                ५७ -  ०० - ०१ - ००मे -                        ०३ -  ०० - ०२ - ००जून -                    ०२ -  ०० - ०० - ००जुलै -                    ०४ -  ०० - ०३ऑगस्ट -              ४१६ -  ०० - ०२सप्टेंबर -              ४१२ - ०० - ०० आक्टोबर -        २५५ - ०० - ००नोव्हेंबर -          २७६ - ०० - ००डिसेंबर -          १०९५ - ४४ - ००

 कोरोना महामारीमुळे ब्रिथ ॲनलायझरचा वापर बंद आहे. शासन निर्देशानुसार कार्यवाही होत आहे. वैद्यकीय तपासणी करून मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीस