शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

सोसायटींमधील मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग

By admin | Published: February 22, 2017 2:34 AM

पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी रहाटणी,पिंपळे सौदागर,वाकड, पिंपळे गुरव पिंपळे निलख यासह पिंपरी-

रहाटणी : पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी रहाटणी,पिंपळे सौदागर,वाकड, पिंपळे गुरव पिंपळे निलख यासह पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू सोसायटीमधील मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. पिंपरी-चिंचवड शहरातील काही प्रभागांत गावठाणापेक्षा सोसायटीमधील मतदानाचे निर्णायक ठरणार असल्याने काही प्रभागातील निकालाकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.सोसायटीमधील इच्छुकांना सर्वच पक्षांनी किमान दोघांना उमेदवारी द्यावी म्हणून आग्रह केला होता. मात्र काही राजकीय पक्षांनी काहींना उमेदवारी दिली, तर काहींनी दिली नाही म्हणून सोसायटीच्या अस्तित्वासाठी सोसायटीमधील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील सोसायटीमधील मतदारांनी अगदी सकाळपासूनच मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. या सोसायटीमधील बहुतांश नागरिक हे हिंजवडी येथील आयटीमध्ये कामास असल्याने अनेकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला, तर महिला दुपारी अकरानंतर मतदान केंद्रावर आल्या. यंदा अगदी घराच्या जवळच मतदान केंद्र दिल्याने मतदार घराबाहेर पडला. या परिसरात अनेक मोठ्या सोसायटीमध्ये मतदान केंद्र सुरु केल्याने सोसायटीधारक मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे चित्र दिसून येत होते. हीच परिस्थिती वाकड,पिंपळे निलख यासह अनेक भागात दिसून येत होती. (वार्ताहर) प्रभाग क्रमांक २० मधील भारतीय जैन संघटना विद्यालय मतदान केंद्रावर खोली क्रमांक ४ मध्ये नरेश भवरलाल चौधरी यांच्या नावामध्ये साम्य असलेल्या एका दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी नरेश चौधरी यांचे प्रदत्त पद्धतीने मतदान करून घेतले. प्रभाग क्रमांक २० मधील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार प्रसाद अरबूज यांच्या निवडणूक चिन्ह नारळ समोरील बटण दाबल्यानंतर मतदान केल्याचा दिवा लागत नसल्याचे समोर आल्यानंतर एक तास मतदान बंद करण्यात आले. अरबूज यांची मशिन बदलून दिल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. यापूर्वी देखील प्रसाद अरबूज यांच्या जागेवर त्यांचे बंधू प्रसन्न अरबूज हे निवडणूक लढविणार होते; परंतु ऐनवेळी त्यांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्यामुळे ऐनवेळी प्रसाद अरबूज हे निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. नेहरुनगरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वच मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी केल्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली. सायंकाळी ५ नेहरुनगरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील मतदान केंद्राजवळ असलेल्या क्रांती चौक येथे हाणामारीची घटना घडली.यामुळे नेहरुनगरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. ४अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांची घटनास्थळी तातडीने भेट दिली. नेहरुनगरमधील प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वच मतदान केंद्रांबाहेर नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे सायंकाळी सातला मतदान संपले.साडेपाचला केंद्र बंद  अगदी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांचा सारखाच ओघ असल्याने सायंकाळी बरोबर साडे पाच वाजता रांगेत उभे असणारे अगदी मोजकेच मतदार उभे होते. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत मतदानप्रक्रिया संपली. सकाळी तुरळक असणारी गर्दी दुपारी १२ नंतर वाढली. मात्र ही गर्दी कायम राहिल्याने मतदानाची टक्केवारी वाढतच गेली . दिवसभर मतदार मतदान करीत असल्याने मतदान बंद झाल्यावर मला मतदान करायचे होते, असे म्हणणारे कोणीच आले नाही.