शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शहरात विजांसह अवकाळी पावसाचा शिडकावा

By admin | Published: May 13, 2017 4:46 AM

पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात शुक्रवारी विजांसह पावसाचा शिडकावा झाला. यामुळे हवेत गारवा पसरल्याने उन्हाच्या कडाक्यापासून हैराण झालेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात शुक्रवारी विजांसह पावसाचा शिडकावा झाला. यामुळे हवेत गारवा पसरल्याने उन्हाच्या कडाक्यापासून हैराण झालेल्या शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या महिनाभरात उन्हाच्या कडाक्याने अंगाची अक्षरश: लाही-लाही झाली. शहराचे तापमान ४१ अंशावर पोहोचले होते. यामुळे दुपारच्या वेळी अनेक जण घराबाहेर पडणेदेखील टाळत होेते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास झालेल्या पावसामुळे हवेत गारवा पसरला. शुक्रवारी दिवसभर कडक उन्हासह ढगाळ वातावरणही दिसून येत होते. मात्र, सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले. विजाही चमकू लागल्या. त्यानंतर सव्वासातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची धांदल उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजण्याशिवाय पर्याय नव्हता. तर काहींनी रस्त्याच्या कडेला अडोसा शोधून पावसात भिजणे टाळल्याचे दिसून आले. दरम्यान, कडक उन्हानंतर पडलेल्या पावसाचा बच्चे कंपनीने आनंद लुटला. शहराच्या काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. यासह पहिलाच पाऊस असल्याने काही रस्तेही निसरडे झाले. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.