पिंपरी :मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे सोमवारी (दि. २२) आकुर्डी-प्राधिकरण येथील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आमदार सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढण्यात आली. या शक्तिप्रदर्शन रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने रॅली सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थिती दाखवली.