Maval Lok Sabha Result 2024| पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी.ची सहावी फेरी पूर्ण होत आली आहे त्यामध्ये पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आघाडीवर आहेत. ५४हजार मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere Patil) पिछाडीवर आहेत. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा परिसरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघ उमेदवारीपासून तर मतदानापर्यंत आणि मतमोजणी पर्यंत चर्चेचा राहिला आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची झाली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचे दावे केले होते, १ लाख ७०हजार मतांनी वाघेरे विजय होणार तर अडीच लाख मतांनी बारणे विजय होणार असा दावा करण्यात आला होता. आज मतमोजणी सुरुवात झाली. १८०० मतांपासून सुरुवातीपासून बारणे यांच्या आघाडीस सुरुवात झाली. सहाव्या फेरी अखेर ५४ हजार मतांनी बारणे यांनी आघाडी घेतली आहे.
या मतदारसंघातून आघाडी
पिंपरी, चिंचवड, पनवेल या मतदार या तीन विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना चांगली आघाडी मिळाली आहे. तर कर्जत, उरण आणि मावळ परिसरातून वाघेरे यांना आघाडी मिळत आहे. शेवटच्या फेरीपर्यंत कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.
बारणे यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले
खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदानानंतर अडीच लाख मतांनी विजय होणार? असा दावा केला होता. आज सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच थेरगाव आणि चिंचवड विधानसभा आणि थेरगाव आणि चिंचवड परिसरामध्ये खासदार बारणे यांच्या विजयाचे पोस्टर लागले होते.