शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

भिशीच्या पैशांसाठी ट्रक चोरणाऱ्या ‘एसटी’च्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 2:48 PM

डिझेल संपले अन् प्लॅन फसला....

ठळक मुद्देगुन्हे शाखेकडून दोघांना अटक : ट्रकसह ११ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्तदोन्ही आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पिंपरी : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा बस चालक असलेल्या एकाने भिशीचे पैसे भरण्यासाठी चक्क लोखंडी स्टीलने भरलेला ट्रक चोरला. ट्रकच्या मूळ चालकाने यासाठी त्याला साथ दिली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मूळ ट्रक चालक आणि त्याचा साथीदार असलेला बस चालक या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शशिकांत आजिनाथ माने (वय 35, रा. मोरेवस्ती, चिखली), विकास राजुरकर (वय 42) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांकडून ट्रक आणि लोखंडी स्टील असा एकूण 11 लाख 66 हजार 777 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान नवनाथ खरात (वय 30, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, खरात यांचा ट्रक ड्रायव्हर विकास राजूरकर जालना येथून 23 टन लोखंडी स्टील घेऊन 12 ऑक्टोबर रोजी चिखलीत आला. त्याने पहाटे पाचच्या सुमारास त्याच्या हरगुडे वस्ती येथील घरासमोर ट्रक लावला आणि घरी गेला. त्यानंतर त्यांचा ट्रक अज्ञाताने चोरून नेला. 

गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू झाला. कारेगाव - केडगाव - दौंड रस्त्यावर लोखंडाने भरलेला ट्रक एका हॉटेलच्या समोर लावला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना मयूर हॉटेल समोर ट्रक मिळून आला. ट्रकच्या केबीनमधील आरोपी शशिकांत माने याच्याकडे चौकशी केली. मूळ चालक विकास राजूरकर याच्या सांगण्यावरून ट्रक चोरून आणल्याचे त्याने सांगितले.  12 ऑक्टोबर रोजी आरोपी विकास हा स्टील भरण्यासाठी जालना येथे गेला. जालना येथून येत असताना दोन्ही आरोपींनी ट्रक चोरण्याचा प्लॅन केला. माने याला भिशीचे 15 हजार रुपये भरायचे होते. दोघांनी जालना जवळ ट्रकमधील काही स्टील विकले आणि त्या पैशांची दारू प्यायली. आरोपी विकास हा स्टील भरून चिखली येथे आला. ठरल्याप्रमाणे विकास ट्रक लावून घरी गेला आणि शशिकांत ट्रक चोरून घेऊन गेला.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक फौजदार रवींद्र गावंडे, सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी मारूती जायभाये, अंजनराव सोडगिर, विजय मोरे, सचिन मोरे, प्रमोद गर्जे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

डिझेल संपले अन् प्लॅन फसलाशशिकांत हा मूळचा जामखेडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो एसटी महामंडळाच्या ठाणे आगारात बस चालक म्हणून नोकरी करत आहे. लॉकडाऊन पासून तो कामावर जात नव्हता. भिशीचे पैसे भरण्यासाठी तसेच घरखर्चासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने विकाससोबत मिळून ट्रक चोरण्याचा प्लॅन केला. ट्रक चोरल्यानंतर माने याच्याकडे ट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो एका हॉटेल समोर ट्रक लावून थांबला होता. डिझेलसाठी आरोपी विकास हा पैसे घेऊन येणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी दोघांना जेरबंद केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकBus DriverबसचालकtheftचोरीThiefचोर