शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

एसटी महामंडळाच्या वायफाय सुविधेचा बोजवारा, लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही सेवा, प्रवाशांमध्ये नाराजी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:46 AM

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.

पिंपळे गुरव : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रात दिवस-रात्र हजारो बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. शहरांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करताना मोबाइलवर आनंद मिळावा म्हणून ही सुविधा सुरू केली. बसमध्ये वायफाय मशिन असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे बुजगावणे म्हणून पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्य महामार्गावर एसटी महामंडळाच्या हजारो बस धावतात.लांब पल्ल्यांच्या बसमध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने ही वायफाय सुविधा बसमध्ये सुरू करण्यात आली. बहुतांशबसमध्ये वायफाय मशिन आहे, पण त्या बंद अवस्थेत आहेत. याबाबत चालक व वाहकांना विचारले असता, या मशिन बसमध्ये बसविल्यापासून बंदच आहेत. वायफाय सुविधा सुरू झालीच नाही. प्रवाशांना हे मशिन फक्त शो पीस म्हणून पाहावे लागत आहे.एसटीमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध असेल या अपेक्षेने प्रवासी बसमधून प्रवास करतात. मात्र, ऐनवेळी वायफाय बंद असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये निराशा पसरते. तरी एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन एसटीमध्ये ही सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.एसटीचे घोषवाक्यठरतेय निरर्थकशासनाच्या वतीने अनेक योजना जाहीर केल्या जातात, मात्र प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. लाभधारकांना प्रत्यक्ष त्या योजनेचा लाभ मिळतो किंवा नाही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. एसटीमध्ये प्रवास, करमणूक हमखास हे घोषवाक्य निरर्थक आहे. यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारामध्ये ५८ बस आहेत. त्या सर्व बसमध्ये वायफाय सुविधा सहा महिन्यांपासून सुरू आहे. एखाद्या बसमधील वायफाय मशिन बंद पडल्यानंतर कर्मचारी लगेच दुरुस्त करून घेतात. ही प्रवाशांसाठीची वायफाय सुविधा प्रभावीपणे राबविणार आहे.- अनिल भिसे,आगार व्यवस्थापक, वल्लभनगरशिवाजीनगर आगारातील तीन बस शालेय सहलीसाठी आणल्या होत्या. त्या तीनही बसमध्ये वायफाय सुविधा मशिन होत्या. मात्र या मशिन बंद अवस्थेत होत्या. ही सुविधा पूर्णत: फसवी असल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. पीएमपीप्रमाणे कर्तव्यदक्ष अधिकाºयांची नितांत आवश्यकता आहे.- बिपीन बनकर, शिक्षक, औंध