शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

सेंट उर्सुला स्कूल अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2015 2:09 AM

शहर शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट उर्सुला स्कूलने संभाजीनगरच्या कमलनयन बजाज स्कूलचा २-० ने पराभव करीत १७ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद प्राप्त केले

पिंपरी : शहर शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट उर्सुला स्कूलने संभाजीनगरच्या कमलनयन बजाज स्कूलचा २-० ने पराभव करीत १७ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद प्राप्त केले. कर्णधार कार्तिक नटराजन याने दोन्ही गोल करीत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. वाकडच्या इन्फंट जिजस स्कूल संघाने तिसरा क्रमांक मिळविला.मासुळकर कॉलनी येथील केशवराव हेडगेवार मैदान येथे गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात पूर्वार्धात नटराजन याने पहिला गोल नोंदवीत १-० ने आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात त्याने आणखी एक गोल नोंदवीत २-० ने आघाडी वाढविली. त्याला अनिकेत ठोंबरे याने पास दिला, तर सायरस मॅसी, देवेन नायडू यांनी त्याला सुरेख साथ दिली. गोलरक्षक धनंजय दिमले याने बजाजचे आक्रमण परतवून लावले. बजाजकडून प्रतीक बिरजे, देवेंश पटेल, गोलरक्षक शुकराज सिंग यांनी चांगला खेळ केला. मात्र, पराभव टाळू शकले नाहीत. वाकडच्या इन्फंट जिजस स्कूलने गटात तिसरे स्थान पटकाविले. काल झालेल्या उपांत्य सामन्यात उर्सुला स्कूलने इन्फंट जिजस स्कूलचा सडनडेथमध्ये ६-५ ने पराभव केला. निर्धारित वेळेत एकही गोल झाला नाही. टायब्रेकरमध्ये उर्सुलाच्या अ‍ॅन्सेल डिसुजा, कार्तिक नटराजन, अनिश कुलकर्णी, अनिकेत ठोंबरे आणि जिजस स्कूलच्या ऋषिकेश कांबळे, अनुराग गोविलकर, प्रथमेश सपकाळ, यश जाधव या चौघांनी गोल करीत ४-४ बरोबरी साधली. सडनडेथमध्ये इवेन नायडू, प्रणव कुष्णकुमार यांनी गोल करीत उर्सुलाला विजय मिळवून दिला. जिजसकडून शंतनु निंबाळकर हा एकटाच गोल करू शकला. बजाज स्कूलने इंदिरा स्कूलचा १-० ने निसटता पराभव केला. अभिराज देशपांडेने विजयी गोल नोंदविला. गुरुवारपासून १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यांना सुरुवात झाली. या गटात एकूण ६१ संघांनी सहभाग नोंदविला आहे. विद्यानंद भवन स्कूलने डॉ. डी. वाय. पाटील स्कूलचा २-० ने पराभव केला. दोन्ही गोल विनय पंडिने केले. सेंट उर्सुला स्कूलने गणेश स्कूलचा ४-० ने एकतर्फी पराभव केला. निखिल करंजकरच्या एका गोलमुळे एसएनबीपी स्कूलने डी. आय. सी. स्कूलचा १-० ने पराभव केला. प्रफुल्ल शेट्टीच्या एकमेव गोलमुळे सीएमएस स्कूलने राजीव गांधी विद्यालयाचा १-० ने पराभव केला. (प्रतिनिधी)