पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार केला. यात तो जखमी झाला. नाशिक फाटा, कासारवाडी येथे रविवारी (दि. ४) ही घटना घडली.
संतोष कानू सारसकर (वय ४०, रा. कासारवाडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. ५) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद (वय २२, पूर्ण नाव माहिती नाही. रा. कासारवाडी), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हर्षद आणि जखमी संतोष यांच्यात पूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.