शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

स्थायी अध्यक्षपदी सीमा सावळे बिनविरोध

By admin | Published: April 01, 2017 2:10 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका सीमा सावळे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका सीमा सावळे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. सावळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सावळे या स्थायी समितीच्या ३३व्या अध्यक्षा आहेत. तसेच, त्या भारतीय जनता पक्षाच्या व शहरातील पहिल्या मागासवर्गीय महिला अध्यक्षा ठरल्या आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकमुखी सत्ता असल्याने महापौर, उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. महापौरपद भोसरीचे आमदार महेश लांडगेसमर्थकांना दिल्यानंतर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा होती. या जागेवर आमदार जगतापसमर्थक सीमा सावळे यांची वर्णी लागणार, याबाबत पहिले वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्ष असून, पुरेशा संख्याबळाअभावी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच सावळे यांचा एकमेव अर्ज होता. त्या महापालिका स्थायी समितीच्या पहिल्याच मागासवर्गीय महिला अध्यक्षा आहेत. निवडीनंतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर, माजी महापौर आझम पानसरे, शंकर जगताप, नगरसेविका आशा शेंडगे, भाजप शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, विरोधी पक्ष नेते योगेश बहल उपस्थित होते.(प्रतिनिधी)अध्यक्षांनी नाकारले वाहनपिंपरी : महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शासकीय वाहन नाकारले असून त्यापाठोपाठ स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनीही महापालिकेचे वाहन नाकारले आहे. पारदर्शक कारभारावर पालिकेतील नवीन सत्ताधाऱ्यांनी भर दिला आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर सावळे यांनी पालिकेचे वाहन वापरणार नाही, असे सांगितले.करदाता हा महापालिकेचा खरा मालक आहे. स्थायी समिती सभेत खर्चाला मंजुरी देताना या करदात्या नागरिकांशी प्रामाणिक राहण्याचा आपला प्रयत्न असेल. उधळपट्टीला लगाम लावण्याबरोबरच आर्थिक शिस्त लावून उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील. त्याची सुरुवात मी स्वत:पासूनच करणार असून, महापालिकेचे वाहन वापरणार नाही. त्यामुळे वार्षिक सुमारे दहा ते बारा लाख रुपयांची बचत होईल आणि या पैशांचा वापर करदात्यांना सुविधा पुरविण्यासाठी केला जाईल. - सीमा सावळे नवनिर्वाचित अध्यक्ष, स्थायी समिती