शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत सायकल शेरिंग सेवेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 5:24 PM

पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी व झुमकार कंपनीच्या माध्यमातून सायकल शेरिंग सेवा पीईडीएल सुरु करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

ठळक मुद्देनगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले सायकल शेरिंग सेवेचे उद्घाटनपिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीच्या सायकल थांब्यावर ठेवण्यात आल्या ५० सायकल

रहाटणी : शहरातील रस्त्यावर वाहनांची संख्या कमी व्हावी, त्याचबरोबर वाहतूक कोंडीला आला बसावा व आरोग्य चांगले यासाठी पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी व झुमकार कंपनीच्या माध्यमातून सायकल शेरिंग सेवा पीईडीएल सुरु करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोझलँड सोसायटी चेअरमन संतोष म्हसकर, सेक्रेटरी आनंदजी दफ्तरदार, जॉइंट सेक्रेटरी चंदन चौरसिया, खजिनदार सिद्धार्थ नाईक, बाबासाहेब साठे, अभय कुलकर्णी, मिथुन गोडबोले यांच्यासह सोसायटी सभासद उपस्थित होते. सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच नसतो. त्याच बरोबर सध्या प्रत्येक व्यक्तीस एक वाहन ही संकल्पना माणसाच्या मनात रुजली आहे. त्यामुळे वातावरणातील वायू प्रदूषण मोठ्या वाढले आहे. त्यामुळे आबालवृद्धांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी व सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या प्रदूषणामुळे निर्माण होणा?्या पर्यावरण विषयक समस्या वर पर्याय म्हणून रोझलँड सोसायटी व झुमकार कंपनी भाडे तत्वावर सायकल शेरिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. वातावरणात प्रदूषणाचे वाढते प्रमाण ही एक चिंतेची बाब आहे. याला नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. तसेच ही सेवा www.pedi. in या वेबसाइडवर उपलब्ध असणार आहे. या सायकलला बारकोड आहे. एखाद्या व्यक्तीने हा बारकोड स्कॅन केल्यानंतरच लॉक उघडणार आहे. या सायकलचे लॉक सोलर उर्जेवर आहे. सदरील वेबसाइडवर गेल्यावर कोणत्या सायकल थांब्यावर किती सायंकाळी उपलब्ध आहेत याची माहिती मिळते व तिथील  सायकलवरील  बारकोड सर्च करून ताब्यात घेता येते, या सायकलचे भाडे आपण आॅनलाईन पद्धतीने भरू शकतो तशी झुमकार कंपनीने सुविधा केली आहे.सध्या पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीच्या सायकल थांब्यावर ५० सायकल ठेवण्यात आल्या आहेत. रोझलँड सोसायटीच्या पर्यावरणपूरक अशा या संकल्पनेची प्रशंसा करत नगरसेवक बापू काटे यांनी रोझलँड सोसायटी चेअरमन, कमिटी मेंबर्स यांचे अभिनंदन करत सोसायटीच्या अशा या उपक्रमांना नेहमी आपला पाठिंबा असेल तसेच महानगर पालिकेमार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे काटे यांनी सांगितले. तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि प्रदूषण मुक्त पर्यावरण करीत आपली मोलाची साथ द्यावी, असे आवाहन काटे यांनी केले आहे. शनिवारी सकाळी या सायकलींची रॅली काढण्यात आली. ही रॅली रोझलँड सोसायटीपासून सुरु झाली ती पुढे शिवार चौक, कोकणे चौक, गोविंद यशदा चौक, कुणाल आयकॉन रस्ता मार्गे पुन्हा रोझलँड सोसायटीत आली. यात अनेकांनी सहभाग घेतला.    सध्या रोझलँड सोसायटीला सायकल थांब्यावरील सायकलींचे भाडे परिसरातील नागरिकांना अर्धा तास करीता १ रु भाड्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे सकाळ व सायंकाळी लहान मुलांसह तरुण, तरुणी, महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात या सायकलवरून फिरताना दिसत आहेत.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड