शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

प्रशासकीय ‘नवदुर्गां’च्या हाती ‘पीएमआरडीए’ विकासाचे स्टेअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:50 PM

विविध विभागांची जबाबदारी महिला अधिकारी चोखपणे पार पाडत आहेत...

-नारायण बडगुजर

पिंपरी : सव्वाकोटीवर लोकसंख्या असलेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विविध विभागांची जबाबदारी महिला अधिकारी चोखपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कामाचा धडाका आणि आवाका अचंबित करणारा आहे. पीएमआरडीए हद्दीतील विकासासाठी या ‘नवदुर्गा’ सरसावल्या आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त त्याबाबत घेतलेला हा आढावा...  

मेट्रो वुमन-

एमपीएससी परीक्षेतील यशानंतर २००० मध्ये राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या रिनाज एम. पठाण या सध्या पीएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तसेच पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता पदाची देखील जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम मोठ्या वेगात होत आहे. यात रिनाज यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा कामाचा झपाटा, शासनाच्या विविध विभांगांशी असलेला समन्वय आणि पाठपुराव्याची चिकाटी तसेच काम मार्गी लावण्याची हातोटी यामुळे मेट्रो प्रकल्प अल्पावधीत दृष्टीपथात आला आहे. त्यामुळे रिनाज यांना पीएमआरडीएच्या मेट्रो वुमन म्हणून ओळखले जाते.

महानगराची ‘भूमाता’

राज्य शासनाच्या महसूल विभागात १९९९ मध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात सर्वात लहान म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी स्नेहल बर्गे यांची निवड झाली. राज्य शासनाने २०१३ मध्ये सर्वोत्तम उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना गौरविले. अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने पीएमआरडीएत नियुक्त झालेल्या अत्यंत मितभाषी बर्गे या पीएमआरडीएच्या जमिनींचे वादविवाद मिटवून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी निधी उभारण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. जमीन व मालमत्ता विभागात त्यांच्या अधिनस्त ८० टक्के महिला अधिकारी व कर्मचारी आहेत.    

‘बुलडोजर वुमन’

उपजिल्हाधिकारी म्हणून २००२ मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेल्या मोनिका सिंह उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून २०२० पासून पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी साडेतीन लाख चौरस फूट अनधिकृत बांधकामावर धडाकेबाज कारवाई केली. त्यामुळे पीएमआरडीच्या ‘बुलडोजर वुमन’ म्हणून सिंह ओळखल्या जातात. अप्पर जिल्हाधिकारीपदी त्यांना बढती मिळाली आहे. सिंह या उर्दू कवयित्री आहेत. त्यांचे उर्दू काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 

स्वप्नातील घर साकारणारी ‘दुर्गा’

उपजिल्हाधिकारी संवर्गात २००९ मध्ये रुजू झालेल्या मनीषा कुंभार यांनी मोठ्या शहरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. प्राधिकरणाच्या विलीनीकरणानंतर पीएमआरडीएमध्ये जमीन व मालमत्ता विभागात कामाचा धडाका सुरूच ठेवला. प्राधिकरणाच्या रेकॅार्डचे स्कॅनिंग करून महापालिकेच्या ताब्यात देण्याची किचकट कार्यवाही केली. सध्या सेक्टर १२, ३० व ३२ मधील गृहप्रकल्पांच्या सदनिकांच्या वाटपाची कार्यवाही सक्षमपणे हाताळत आहेत. सदनिकांच्या वारस नोंदी, हस्तांतरण, कर्जासाठी नाहरकत दाखला देणे अशा सर्वसामान्यांशी संबंधित कामकाजासाठी ॲानलाईन सुविधा देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सामान्यांचे घरांचे स्वप्न साकारण्यास मदत होत आहे.  

लेडी लँड बँकर

उपजिल्हाधिकारी पदावर २००९ पासून कार्यरत असलेल्या शिल्पा नरसिंह करमरकर या पीएमआरडीएची लँड बँक सांभाळतात. पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागात त्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या विभागाच्या त्या आधारस्तंभ आहेत. जमीनविषयक सर्व कायदेशीर बाबी तपासणे, त्यांची काळजी घेणे, आवश्यक भूखंड, जमीन प्राप्त करून घेणे या सर्व बाबी सक्षमपणे सांभाळत आहेत.

पीएमआरडीएची ‘धनलक्ष्मी’

राज्य शासनाच्या वित्त विभागात १९९९ मध्ये रुजू झालेल्या सविता नलावडे यांनी समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, पुणे महापालिका, कोषागार कार्यालय पुणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी ठिकाणी लेखा व वित्त विभागात काम केले. एप्रिल २०२२ मध्ये पीएमआरडीएत त्यांची नियुक्ती झाली. वित्त आणि लेखा परीक्षण तसेच वित्तीय सल्लागार म्हणून या विभागात नलावडे उल्लेखनीय कामकाज करीत आहेत.  

‘ती’ धडाकेबाज

पीएमआरडीच्या कार्यकारी अभियंता असलेल्या शीतल देशपांडे यांच्याकडे म्हाळुंगे- माण नगररचना परियोजनेची जबाबदारी आहे. हा प्रकल्प पथदर्शी ठरून इतर प्रकल्पांना चालना मिळेल. अचूक आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता असल्याने देशपांडे यांची या प्रकल्पासाठी निवड झाली. मितभाषी मात्र, कामाचा धडाका ही त्यांची खासीयत आहे.   

महानगराची ‘ती’ रचनाकार 

सहायक नगररचनाकार म्हणून २०१४ मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेल्या श्वेता पाटील या पीएमआरडीच्या उपमहानगर नियोजनकार आहेत. पीएमआरडीएच्या बांधकाम परवानगी विभागाची जबाबदारी २०१९ पासून सांभाळत आहेत. या विभागाकडून बांधकाम परवानगी देण्यात येते. त्यासाठीची प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी करण्यासाठी पाटील यांनी प्रयत्न केले. पीएमआरडीए हे एक स्वतंत्र महानगर आहे. त्याची रचयती म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

महसूलदार तहसीलदार

एमपीएससी परीक्षेत यश मिळवून २००७ मध्ये औरंगाबाद विभागात नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या मनीषा तेलभाते यांनी वैजापूर, खुलताबाद येथे उल्लेखनीय कामकाज केले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे प्रतिनियुक्तीने, तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली. ऑगस्ट २०२१ पासून पीएमआरडीएमध्ये अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात कार्यरत आहेत. मिळकतींशी संबंधित वादविवाद तसेच तांत्रिक अडचणी सोडविण्यात त्यांचा हातखंडा आहे.

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएPuneपुणेNavratriनवरात्रीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड