पिंपरी : कंपनी आणि महाविद्यालय परिसरातून दुचाकी चोरून नेण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. याप्रकरणी भोसरी, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय वसंत पाटील (वय २९, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी येथील खासगी कंपनीसमोर अक्षय यांनी त्यांची दुचाकी (एम एच १९ सीएम ९१८५) पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश ज्ञानेश्वर पाटील (वय ३०, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरूवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता त्यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १२ एच एम ५२३३) हिंजवडी फेज येथील खासगी कंपनीसमोर लावली होती. अज्ञात चोरट्यांने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. तिसºया घटनेत सूरज अनिल टेकाळे (वय ४५ , रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मोटारसायकल (एम एच १४ यु १४९१) ताथवडे येथील जीएसपीएम महाविद्यालयासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांने गाडीचे लॉक तोडून गाडी चोरून नेली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
पिंपरीकरांनो दुचाकी सांभाळा : शहरात एकाच दिवशी तीन चोऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 9:02 PM