शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

वितभर पोटासाठी ‘ती’ बनली नावाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:08 AM

बाराही महिने बलुतेदारी करून संसाराचा गाडा नाणोलीतर्फे चाकण येथील नावाडी महिला ओढीत आहे.

- सचिन शिंदे तळेगाव स्टेशन : बाराही महिने बलुतेदारी करून संसाराचा गाडा नाणोलीतर्फे चाकण येथील नावाडी महिला ओढीत आहे. सोसाट्याचा वारा असो की मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी किंवा रणरणते ऊन याची पर्वा न करता ती कुटुंबीयांसाठी राब राब राबत आहे. हजारो लोकांना रोजगार मिळवून देणाऱ्या तळेगाव औद्योगिक वसाहातीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वराळे ते नाणोली गावाला होडीच्या माध्यमातून नावाडी म्हणून जोडण्याचे काम ही माऊली करीत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून बेबीताई गव्हाणे ही ज्येष्ठ महिला तीनही हंगामातकरत आहे. दोन्ही गावाला दळण वळणाचे साधन नसल्याने त्यांना नदीतून होडीच्या साह्याने यावे जावे लागते. हीच होडी आपला जीव तळहातावर घेऊन फक्त बलुतेदारीवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून नावाड्याचे काम करत आहे. होडीची दुरवस्था झाली आहे़ होडीला पडलेल्या छिद्रातून पाणी होडीत येऊ शकते. जीव मुठीत घालून प्रवाशांसह ती रोज नौकेतून प्रवास करीत आहे. गेल्या दोन पिढ्यांपासून गव्हाणे कुटुंबीय ही सेवा रूजू करीत आहे.वराळेतील शेतकरी, महिला, पुरुष, नाणोलीतर्फे चाकण येथून वराळेला जातात. भैरवनाथ विद्यालयात शिकणारे विद्यार्थी या होडीतून रोज प्रवास करीत आहेत. नाणोली वराळेला जोडणारा हा दुवा बेबीताई गव्हाणे या पन्नाशीच्या भगिनी साधित आहेत. त्यांचे सासरे दत्तात्रेय गव्हाणे इंद्रायणीच्या या तीरावरून त्या तीरावर शेतकरी पोहचवित, त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून गावकरी त्यांना शेतात पिकणारे धान्य बलुतं म्हणून देत़ वावरातील ज्वारी, बाजरी, गहू,भाताच्या धान्यावर या कुटुबीयांचा उदरनिर्वाह होत होता. सासरे दत्तात्रेय यांच्या पाश्चात्य त्यांचा मुलगा नाव हाकीत होते; पण वयोमानानुसार त्यांना हे शक्य नसल्याने त्यांच्या सूनबाई बेबीताई नावाडी बनल्या आहेत.>बलुत्यावर उदरनिर्वाहकुटुंबाला त्याच्या बलुत्याने आधार दिला असला तरी सद्य:स्थितीत बलुते सर्वच शेतकरी देत आहेत असे नाही़ नाणोलीतील दूध व्यावसायिक या नावेतून जाता नसल्याने त्यांनी बलुते बंद केले. पण येथून जाणारी सर्व मुलांचे पालकही प्रवासाच्या मोबदल्यात काहीच देत नाही. सद्य:स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, तर एसटीने देखील दरवाढ केली. असे असतानाही ही महिला मात्र फक्त आपल्या परिवाराला दोन वेळेची भाकरी मिळावी म्हणून वर्षातून एकदा मिळणाºया बलुतेदारीवर प्रवासी ने-आण करण्याचे काम करत आहे.बलुत्यातून मिळणाºया धान्यावर पोट भरत नाही़ पावसात धोकादायक नाव वलविण्याचे काम सुरूच आहे. शेत नसल्याने आम्ही जगावे कसे? माझा मुलगा मंगेश गव्हाणे याच्या पायाला दुखापत झाली आहे़ त्यावर शस्त्रक्रिया करायची पण खिशात दमडी नाय आम्ही काय करावे. - बेबीताई गव्हाणे>तारेवर नावेची मदार : बेबीताई गव्हाणेंची कसरतनदीच्या दोन्ही बाजूला मोठी तार बांधली आहे़ बाभळीच्या खोडाला बांधलेल्या तारेवरच नावेची मदार आहे. पिढ्यानपिढ्या जीव धोक्यात घालून प्रवास करणाºया गावकºयांची सुरक्षितता रामभरोसे आहे. मावळात रोज लाखो रुपयांचा रस्त्याच्या, पुलांच्या कामाची उद्घाटने होत आहेत. या दोन्ही गावात आतापर्यंत अनेक मोठे राजकीय पुढारी होऊन गेले आहेत़ मग त्यांना हा पूल बांधायला का जमला नसेल, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे़