सासवड : पुरंदर तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावित विमानतळास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. एखतपूर येथे सोमवारी रस्त्याच्या भूमिपूजनासाठी जलसंपदा राज्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमास जाहीर विरोध करण्यासाठी विमानतळविरोधी शेतकºयांनी एकत्र येत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या वेळी अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत भाजपाचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात विमानतळविरोधी कृती समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांच्यासह वीस जणांवर गुन्हा दाखल.
एखतपूर (ता. पुरंदर) येथे शिवसेनेतर्फे राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार होता. राज्यमंत्री या भागात येणार असल्याने विमानतळविरोधी शेतकरी ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत शिवतारे यांच्या हस्ते होणाºया कार्यक्रमाला विरोध केला. या वेळी येथील सरपंचानी तसेच सदस्यांनी विमानतळाला आमचाही विरोध आहे असे सांगत हा रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम वेगळा असल्याचे सांगत कार्यक्रम होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या वेळी मोठ्या आवाजात डीजे लावून व त्यावरून आवाहन करत हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. याचदरम्यान काहींनी दगडफेक केली. यात एक जण जखमी झाला. झालेला गोंधळ पाहता पोलिसांनी विमानतळविरोधी कृती समितीचे पदाधिकारी यांना बोलावून या ग्रामस्थांना शांत करण्याविषयी आवाहन केले. मात्र, या कार्यक्रमास राज्यमंत्री विजय शिवतारे हे येणार नाहीत असे सांगितले. या गदारोळातच पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के यांच्या हस्ते या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य सरपंच आदी उपस्थित होते. यामध्ये मोठ्या संख्येने बाहेरगावावरून शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.जखमींनी दिली तक्रारदगडफेकीत जखमी झालेले भाजपाचे कार्यकर्ते श्रीकांत ताम्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एखतपूर मुंजवडी येथील रस्त्याच्या प्रारंभाच्या कामासाठी जमलेल्या समुदायावर दगडफेक करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी विमानतळविरोधी कृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे व त्यांच्या वीस सहकाºयांच्या विरोधात फिर्याद दिली. यामुळे झुरंगे यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.खरे चिथावणीखोरवक्तव्य हे राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे खासगी स्वीय सहायक व एखतपूर गावचे रहिवासी माणिक निंबाळकर यांनी केल्याने ही घटना घडली. त्यांचा या ठिकाणचा हस्तक्षेप व पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असून माझ्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असून शेतकºयांसाठी असे हजारो खोटे गुन्हे दाखल झाले तरी मी कायमच लढत राहणार असून, माझी भूमिका शेतकरी हिताची आहे. शेवटच्या श्वासापर्यंत बाधित शेतकºयांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे.- दत्ता झुरंगे, जिल्हा परिषद सदस्य व विमानतळ विरोधी कृती संघर्षसमितीचे अध्यक्ष.