शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

महावितरणच्या बिलातील गोंधळ थांबवावा

By admin | Published: March 22, 2017 3:15 AM

एका ग्राहकाच्या तक्रारीवरून सर्वच ग्राहकांचा सारासार विचार करीत पारदर्शक बिलप्रणाली अवलंबावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होणार नाही,

वाकड : एका ग्राहकाच्या तक्रारीवरून सर्वच ग्राहकांचा सारासार विचार करीत पारदर्शक बिलप्रणाली अवलंबावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होणार नाही, त्याचे अतिरिक्त पैसे जाणार नाहीत यासाठी गंभीर पावले उचलावीत. गेलेली जादा रक्कम ग्राहकांना परत करावी अशी मागणी वाकडच्या रहिवाशांनी महावितरणकडे बैठकीदरम्यान केली. गेल्या महिन्यात वाकडमधील पीसी सहाच्या महावितरण ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव बिले आल्याने मोठा गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनादेखील याबाबत ईमेलद्वारे तक्रार समजली. अखेर महावितरणने नम्र निवेदनाद्वारे पुढील बिलात अतिरिक्त रक्कम वळती करणार असल्याचे सांगितले. मात्र या एका आश्वासनाने वाकडकर शांत न बसता सर्वच स्तरावर वाकडच्या रहिवाशांनी आवाज उठविल्यानंतर अखेर महावितरणने या ग्राहकांची बैठक घेत त्यांचे प्रश्न समाजावून घेतले. या वेळी अनेक प्रश्नांचा भडीमार ग्राहकांनी केला. बैठकीला शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक राहुल कलाटे, महावितरण अधिकारी महेंद्र दिवाकर, नगरसेवक तुषार कामठे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. एम. सावंत, नगरसेविका ममता गायकवाड, माजी नगरसेवक सुरेश चोंधे, उपअभियंता अनिल गौडा, नितीन विसपुते (संगणक विभाग प्रमुख), सचिन गुणाले, अरुण देशमुख,सचिन लोंढे, सुदेश राजे, सुधीर देशमुख किरण वडगामा, अभिजित पवार, चंद्रशेखर मेटकर, दत्तात्रय देशमुख, शिवाजी कटके यांच्यासह वाकडमधील सर्व सोसायट्यांतील रहिवासी उपस्थित होते. महावितरणच्या सुमारे लाखभर ग्राहकांच्या बिलात झालेला गोंधळ अरुण देशमुख यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वाकड परिसरातील सर्व सोसायट्यांच्या सभासदांच्या ग्रुपवर पोस्ट टाकत आवाज उठविला. त्याला सर्वांचे अभिप्राय सुरू झाले. ग्रुपमधील अ‍ॅक्टिव्ह सभासद सचिन गुणाले यांनी पुढाकार घेतला. ते सध्या कॅनडा या देशात आहेत. त्यांनी महावितरणचे सर्वोच्च अधिकारी संजीव कुमार यांना ई मेल करीत सर्वांना मेल करायला सांगितले. असे असंख्य मेल त्यांच्या मुंबई कार्यालयाला आणि मुख्यमंत्री कार्यालयात गेल्याने सर्वच स्तरांवर महावितरण कार्यालयात फोन सुरू झाल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले. यानंतर वाकड रस्त्यावरील नंदन इन्स्पेरा या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत व्हिलिंग चार्जेस वाढल्याने बिले वाढली असावीत, असा अंदाज वर्तवीत रीडिंगसाठी ६० अतिरिक्त माणसे नेमली आहेत. अ‍ॅडव्हान्स पेमेंट घेणाऱ्यांवर कठोर करवाई करणार, ३० दिवसांची बिलिंग सायकल कायम ठेवत सहा ते आठ महिन्यांचा डाटा चेक करू आणि जादाचे पैसे वळते करू, व्हर्जनमुळे बिल कमी-जास्त येते, इथून मागे अनेकदा बिल कमी देखील आली आहेत. मात्र त्याबद्दल कोणी बोलत नाहीत. जादा बिल येताच ओरड सुरु होते. मात्र पीसीवाईज ते चेक करवून आम्ही तूट भरून काढू ,असे आश्वासन महावितरणच्या अधिका-यांनी दिले. दीड लाख ग्राहकांपैकी गेल्या आठ महिन्यांत ग्राहकांना आलेली जादाची सहा ते आठ कोटींची बिले परत करणार का? हा घोळ थांबविण्यासाठी पोलीस मित्रच्या धरतीवर एमएसईबी मित्र नेमा, ३० दिवसांचे बिलिंग सायकल कायम करा, वाकड परिसरात केवळ ताथवडे आणि रहाटणी हे कार्यालय असल्याने मोठी कसरत होते; त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी महावितरणचे एक कार्यालय उभारावे. यातून मार्ग निघणार नाही तोपर्यंत बिल भरणार नाही, असे मुद्दे ग्राहकांनी उपस्थित केले. (वार्ताहर)