शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दौंडकरवाडी व रामनगर परिसरात वादळी वाºयासह मुसळधार पावसाने विद्युत खांब जमिनीवर कोसळले. विशेष म्हणजे वीज पुरवठा करणारा एक खांब येथील यशंवत दौंडकर यांच्या घरावर पडता-पडता अगदी थोडक्यात बचावला. सुदैवाने तो घराशेजारी पडल्याने मोठा अनर्थ टळला.
मागील दोन दिवसांपासून परिसरात वादळी वाºयासह पाऊस पडत आहे. मात्र, मंगळवारी (दि. २) उशिरा विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. वाºयाचा वेग जास्त प्रमाणात असल्याने दौंडकरवाडी, रामनगर परिसराला वीज पुरवठा करणारे एकूण चार खांब जमिनीवर कोसळले आहेत. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या भोसे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु वीज वितरण कंपनीकडून अद्याप वीज दुरुस्तीसंदर्भात कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.४परंतु वीज वितरण कंपनीकडून अद्यापही वीज दुरुस्तीसंदर्भात कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. जमिनीवर पडलेले खांबांची वीज वितरणकंपनीने लवकरात - लवकर दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सीताराम गुजर, दिलीप लांडे, सिताराम लांडे, बाळासोा लांडे, अतुल लांडे, लक्ष्मन लांडे, सुभाष दौडकर, मच्छिंद्र दौंडकर आदींनी केली आहे.