मावळ : कोणत्याही माध्यमातून पेज न्यूजव्दारे उमेदवारांनी प्रचार करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यावर त्वरीत नोटीस बजविण्यात येईल. तसेच अशा पेडन्यूजवर प्रशासकीय अधिकारी व निवडणुक आयोगाने करडी नजर ठेवावी अशा सूचना खर्च विषयक निवडणूक निरीक्षक विजयकुमार चड्डा यांनी दिला विजयकुमार चड्डा ( आयआरएस ) यांनी गुरूवारी मावळ लोकसभा मतदार संघातील मावळ पंचायत समितीत अधिकाºयांची बैठक घेऊन सुचना दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे, अतिरिक्त अधिकारी रणजीत देसाई, आचारसंहिता कक्षप्रमुख शरदचंद्र माळी ,नायब तहसीलदार सुनंदा पाटील, लोणावळा विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर शिवतरे, देहूरोड विभागाचे गणपत माडगूळकर यांच्यासह पोलिस निरीक्षक व शासकीय अधिकारी उपस्थित होते. पेडन्यूज, पेट्रोलपंप, हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने यांवर कडवी नजर ठेवण्याचे आदेश यावेळी दिले.कोणत्याही उमेदवाराने जाहीरात प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. उमेदवाराने पेडन्यूजव्दारे प्रचार केल्याचे आढळल्यास त्वरीत नोटीस बजवून त्याचा खुलासा विचारावा. भरारी पथकांनी विविधसभा व इतर प्रकारांच्या ठिकानी जाऊन करडी नजर ठेवावी. उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. उमेदवार केलेला खर्च दाखवतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवावे. अशा विविध सूचना यावेळी चड्डा यांनी दिल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली..
मावळ मतदार संघात पेडन्यूज प्रसिद्धीवर प्रशासनाची राहणार करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 6:03 PM