शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अनुचित प्रकार टाळत कामशेतमध्ये कडकडीत बंद; बहुतांश सर्व दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 4:24 PM

भीमा कोरेगाव येथे झालेल्या वादामुळे निर्माण झालेल्या जातीय तेढ या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी व भीम सैनिकांनी पुकारलेल्या मावळ बंदला कामशेत शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देकामशेत शहरातील बाजारपेठ दिवसभर ओस, सर्वत्र शुकशुकाटसोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर केली जाणार कडक कारवाई 

कामशेत : भीमा कोरेगाव येथे झालेल्या वादामुळे निर्माण झालेल्या जातीय तेढ या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी व भीम सैनिकांनी पुकारलेल्या मावळ बंदला कामशेत शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट), मावळ तालुका यांच्यावतीने कामशेत बंदचे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले होते.कामशेत शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश सर्व दुकाने बंद होती. याचवेळी शहरातील दवाखाने, मेडिकल या आरोग्य सेवा अंशत: सुरू होत्या. याचप्रमाणे शहरातील पंडित नेहरू विद्यालय हे नेहमी प्रमाणे सुरू होते. जनजीवन सुरळीत सुरू होते. कोठे ही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी दोन च्या सुमारास देहूरोड ते लोणावळा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली. यावेळी कामशेत पोलीस ठाणे येथून ते पंडित नेहरू विद्यालय या मार्गी रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, मावळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, केंद्र्रीय सदस्य रवींद्र्र भवार, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माऊली सोनवणे, नाणे मावळ अध्यक्ष विलास गायकवाड, रवी भवार, मधू कांबळे, अमित वंजारी, प्रमोद गायकवाड, रोहिदास सोनवणे, प्रशांत थोरात, संदीप ओव्हाळ, बाळासाहेब शिंदे, जयराम साळवे, प्रकाश गायकवाड, बबन वंजारी, बाळकृष्ण टपाले आदी उपस्थित होते.शहरातून गेलेल्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीवर या बंदचा जास्त परिणाम झाला नाही. मात्र शहरातील व आजूबाजूच्या खाजगी शाळांनी बंदच्या भीतीने अचानक अघोषित सुट्टी जाहीर केल्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस न आल्याने पालकांची गडबड झाली. तर अनेक पालकांनी शाळांमध्ये फोन करून शाळा सुरू आहे की नाही याची चौकशी केली. याच प्रमाणे कामशेत शहरातील पवनानगर फाट्यावर असणाऱ्या मजूर अड्ड्यांवर बंदचा मोठा परिणाम झाल्याचे दिसले असून अनेक मजूर काम न मिळाल्याने घरी रिकाम्या हाताने परतले. शहरातील सर्व दुकानदारांनी १०० टक्के बंद पळाला. त्यामुळे कामशेत शहरातील बाजारपेठ दिवसभर ओस पडली होती. सर्वत्र शुकशुकाट होता. 

कामशेत व परिसरामध्ये सर्वत्र शांततापूर्ण वातावरण असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर शिवाय कोणत्याही प्रकारचा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.- आय. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामशेत पोलीस ठाणे 

टॅग्स :kamshetकामशेतBhima-koregaonभीमा-कोरेगावpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड