शहरं
Join us  
Trending Stories
1
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
2
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
3
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
4
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
5
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
6
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
7
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
8
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
9
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
10
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
11
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
12
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
13
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
14
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
15
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
16
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
17
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
18
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
19
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
20
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा

‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 4:27 AM

शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.

पिंपरी : शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाजवळ ट्रकच्या धडकेत अशीष पावसकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा सुरू होताना आणि सुटताना तेथील रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे आहे. चिंचवडमधील काकडे पार्क, श्रीधरनगर, भोईरनगर, पवनानगर, वाल्हेकरवाडी परिसरात विविध शाळेंसमोर विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांची वर्दळ असते. चापेकर चौक व जुना जकात नाका परिसरात असणाºया शाळा व महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर विद्यार्थी बसची वाट पहात उभे असतात. येथे बस थांबे नसल्याने विद्यार्थी रस्त्यावर उभे राहतात. शाळेची इमारत दिघी गावठाणात असून, परिसरातील शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या ३५० च्या वर आहे. शाळेत येण्यासाठी दिघी-आळंदी रस्ता ओलांडून यावे लागते. लक्ष्मणनगर शाळा भरण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आलेले पालक रस्त्यातच वाहने पार्क करतात.वाहनपरवाना असल्याशिवाय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पार्किंग करू देऊ नये, तसेच पालकांनी पाल्याला परवाना असल्याशिवाय गाडी हातात देऊ नये, यासारख्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.माणुसकी हरवतेयअपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फोटो काढण्याची घाईच जादा झालेली असते. तर अनेक जण बघ्याची भूमिका घेतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. पण अपघातानंतर हे चित्र दिसत नाही. त्यामुळे माणुसकी हरवत चालली आहे, असे मत व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांची स्टंटबाजी जिवावरशहर परिसरात अनेक विद्यार्थी विनापरवाना वाहन चालवितात. तसेच ते अनेक वेळा स्टंटबाजी करतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. फोनवरच बोलत वाहन चालविण्याचा नवा फंडा तयार केला आहे. त्यामुळे अनेक वेळा हॉर्न वाजविला तर ऐकायला न येणे, पुढून येणारे वाहन न दिसणे यासारखे प्रकार घडत आहेत. मुलांची स्टंटबाजी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड