देहूरोड : शेलारवाडी (मावळ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या महापालिका हद्दीतील विविध चार महाविद्यालयांमार्फत राष्ट्रीय सेवा योजनेत समर्थ भारत अभियान- सक्षम युवा समर्थ भारत अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिर घेण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या २५० विद्यार्थ्यांनी जलसंधारण मोहीम राबवून बंधारा उभारल. स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती व पथनाट्य सादरीकरण केले.
डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य, व ताथवडेतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी या चार महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय शिबिर आयोजित केले होते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बोर्डाचे सीईओ अभिजित सानप, नगरसेवक रघुवीर शेलार, पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, प्राचार्य डॉ. मोहन वामन, प्राचार्य डॉ. रणजित पाटील, सेवा योजनेचे कर्यक्रम अधिकारी गणेश फुंदे, सतीश भेगडे, अतुल शेलार, अमित भेगडे, विजय माळी, श्रीकृष्ण भेगडे, संदेश भेगडे आदी या वेळी उपस्थित होते.शिबिर समारोपावेळी पुणे जिल्हा किसान संघाचे अध्यक्ष शंकर शेलार, कॅन्टोन्मेंटचे मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, बाळासाहेब जांभुळकर, कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष पोपट भेगडे, उद्धव शेलार, अमित भेगडे, बाळासाहेब शेलार, संदेश भेगडे, अतुल शेलार, केदार शेलार तसेच प्राचार्य डॉ़ मोहन वामन आदी उपस्थित होते.शिबिरात पाच दिवस श्रमदान करून विद्यार्थ्यांनी शेलारवाडी येथील अमरदेवी पालखी मार्गाजवळ जुन्या नाल्यावर बंधारा बांधला. कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी या वेळी स्वच्छता मोहीम राबविली. शेलारवाडी गावात विविध भागांत विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पाणीबचत, शिक्षण आदी सामाजिक विषयांवर पथनाट्य सादर करून जनजागृती केली. विद्यार्थिनींनी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेतला. पाच दिवस व्याख्यानमालाही झाली.