शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

शहरातील विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल

By admin | Published: June 30, 2017 3:52 AM

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)ला पुरविण्यात येणाऱ्या ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील बस गुुरुवारी अचानक बंद राहिल्याने पीएमपी प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी)ला पुरविण्यात येणाऱ्या ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील बस गुुरुवारी अचानक बंद राहिल्याने पीएमपी प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. निगडी, भोसरी आणि पिंपरी या तिनही आगारातील एकूण १६१ बसेस बंद होत्या. बसची कमतरता असल्याने तासन्तास बसची वाट पाहत प्रवासी उभे असल्याचे चित्र विविध बसस्थानकांवर दिसत होते. भाडेतत्त्वावरील बसेस गुरुवारी सकाळी बंद झाल्या. यामुळे शहरातील निगडी, भोसरी आणि पिंपरी या तिनही आगारातील बस आगारातच उभ्या होत्या. बसवरील वाहकांनाही बसून राहण्याची वेळ आली. दरम्यान, गुरुवारी दिवसभर शहरात केवळ खात्याच्याच बसेस धावत होत्या. निगडी, भोसरी आणि पिंपरी या तिनही आगारातील एकूण १६१ बसेस बंद होत्या. निगडी आगारातून मनपा भवन, पुणे स्टेशन, हडपसर, कोथरूड डेपो, वारजे माळवाडी, कात्रज, हिंजवडी, देहूगाव, वडगाव आदी मार्गांवर बस धावतात. निगडी आगार हे पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य आगार मानले जाते. यासह भोसरी आणि पिंपरी आगारातूनही विविध मार्गांवर बस धावतात. मात्र, गुरुवारी पुकारलेल्या संपामुळे अनेक मार्गांवरील बस बंद ठेवण्यात आल्या. तर काही मार्गांवरील बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. या संपामुळे चाकरमानन्यांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. विद्यार्थ्यांनाही बसेससाठी धावपळ करावी लागली. अचानक बस बंद झाल्याने अनेकांची गैरसोय झाली.