पिंपरी : आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत भोसरी इंद्रायणीनगर येथील वसतिगृहाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. तो गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अमित गणपत वळवी (वय २५ ,रा. कालीबेल, नंदूरबार) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील इंद्रायणीनगर याठिकाणी आदिवासी वसतिगृहात एकूण २४३ विद्यार्थी राहतात. अमित पिंपरी गावातील महाविद्यालयात भूगोल विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.दोन वर्षांपूर्वी तो या वसतिगृहात आला होता.वसतिगृहात अनेक समस्यांना तो तोंड देत होता. शासनाकडून मिळणारे डीबीटी अनुदान त्याला वेळेवर मिळत नव्हते. तेथे खानावळ देखील उपलब्ध नव्हते. डीबीटीचे पैसे मिळाले तरी, महाविद्यालयात ये जा करण्यासाठी येणार खर्च, तसेच इतर खर्च याचा ताळमेळ घालताना त्यांना अडचणी येत होत्या .तो कायम तणावाखाली असायचा असे वसतिगृहातील विद्यार्थी सांगत आहेत. डीबीटी नको, पूर्वीप्रमाणे मेसची सुविधा द्या, अशी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मागणी आहे. अमितचे बंधू सुनील नंदूरबारहून आले आहेत. रुग्णालयात त्यांची भेट झाली, ते म्हणाले, अमित चा अपघात झाला असे कळविण्यात आले, त्यामुळे तातडीने पुण्यात आलो आहे. अमितला चांगल्या प्रकारचे उपचार मिळावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
भोसरी येथे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 11:52 AM
भोसरी येथील इंद्रायणीनगर याठिकाणी आदिवासी वसतिगृहात एकूण २४३ विद्यार्थी राहतात.
ठळक मुद्देडीबीटी नको, पूर्वीप्रमाणे मेसची सुविधा द्या, अशी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मागणी आहे.