शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक धोरणासाठी अभ्यास गट

By admin | Published: May 09, 2017 3:49 AM

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती तसेच पायाभूत सुविधांसाठी अनुदान यांसह विविध योजना राबविल्या जातात. मात्र, अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक असल्याने एक अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे.अल्पसंख्याक शाळा/ संस्थांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार आदेश दिले आहे. तसेच अल्पसंख्याक शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासंदर्भात प्रशासकीय व शैक्षणिक धोरण तयार करणे आवश्यक आहे. सध्या अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण अस्तित्वात नाही. परिणामी, प्रशासकीय स्तरावर संभ्रमावस्था आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कायदा व धोरण तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातर्फे अभ्यास गट स्थापन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या अभ्यास गटाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी सध्या सुरू असलेल्या किंवा सुरू करावयाच्या शासकीय योजनांबाबत विचारविनिमय, तसेच सखोल अभ्यास केला जाणार आहे. शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाने सर्व बाबींचा विचार करून येत्या दोन महिन्यांत शिफारशी शासनास सादर कराव्यात, असे अध्यादेशात नमूद केले आहे.