लोणावळा : सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन व लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहत लोणावळा यांच्या वतीने राज्यभरातील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या समस्या जाणून घेण्याकरिता लोणावळ्यात आयोजित बैठकीला सहकारमंत्री देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, उद्योग सहसंचालक राधाळकर, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मावळचे सभापती गुलाबराब म्हाळसकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, बाबा शेट्टी, जयश्री आहेर, देविदास कडू, लोणावळा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष देवराम लोखंडे, प्रकाश कोटनिस, सहकारी संस्थांचे निबंधक मिलिंद अत्रे, पुणे विभागाचे निबंधक राजाळे, जिल्हा उपनिबंधक कटके आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले, की मागील २० वर्षांपासून सहकार विभाग व शासन यांच्या दुर्लक्षित धोरण व पाठपुराव्या अभावी सहकारी संस्थांच्या समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यापुढील काळात मात्र या संस्थांना महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्याकरिता कसोशिने प्रयत्न करणार आहे. त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांना लागणारा कच्चा माल, कुशल कामगार, अल्पदरात विज अथवा सौरऊर्जा, उत्पादित मालाकरिता बाजारपेठ या गोष्टी उपलब्ध करुन देण्यावर सहकार विभागाचा भर असेल असे सांगितले.
सहकारी औद्योगिक वसाहतींना नव्याने उभारी देणार : सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:19 PM
सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
ठळक मुद्देराज्यभरातील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या समस्या जाणून घेण्याकरिता लोणावळ्यात बैठकमागील २० वर्षांपासून सहकारी संस्थांच्या समोर अनेक समस्या : देशमुख