पुणे : पर्यावरणपूरक व सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसाठी अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘इलेक्ट्रिक बस’ची अखेर गुरुवारी शहरात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. पुढील सात दिवस भरलेली पोती टाकून शहराच्या सर्व भागातून, मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी या बसची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच शहरात २५ इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.
पुणे शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व पीएमपीच्या ताफ्यात सक्षम व चांगल्या बस आणण्यासाठी इलेक्ट्रिक बसेचा पर्याय समोर आला. अनेक महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठीची पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली. नऊ मीटर लांबीची ही ‘नॉन बीआरटी बस’ बीवायडी (ओलेक्ट्रो) कंपनीची आहे.
पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेचे पाऊल म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५०० वातानुकूलित ई-बस घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० आणि दुसऱ्या टप्प्यात ३५० बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५० बस त्यांपैकी २५ मिडी आणि १२५ रेग्युलर बस घेणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली. त्यामध्ये नऊ मीटर लांबीच्या बससाठी बीवायडी (इलेक्ट्रो) कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे, तर १२ मीटर लांबीच्या बससाठी टाटा कंपनी व ‘बीवायडी’ कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे.
महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव, पीएमपीच्या व्यवस्थापकीय अध्यक्ष नयना गुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ८) टिळक रोड, स्वारगेट, बाजीराव रोड या परिसरात चाचणी घेण्यात आली.शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोगी ठरेलशहरात दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसची चाचणी गुरुवारी घेण्यात आली. बाजीराव रोड, टिळक रोड या गर्दीच्या रस्त्यांवर या बसची चाचणी घेण्यात आली. आवाजविरहित, अत्यंत स्मूथ अशी ही इलेक्ट्रिक बस आहे. सध्या देशात व जागात सर्वच ठिकाणी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक बसची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी या इलेक्ट्रिक बस उपयोगी ठरतील.- मुक्ता टिळक, महापौर२६ जानेवारीपर्यंत शहरात २५ इलेक्ट्रिक बसपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५०० वातानुकूलित ई-बस घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० बस खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठीच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपनीकडून गुरुवारी (दि. ८) सार्वजनिक वाहतुकीतील शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली. आता पुढील सात दिवस शहराच्या विविध भागात या बसची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर कर्मशील बीड ओपन करून सुरुवातील २५ इलेक्ट्रिक बसची आॅर्डर देण्यात येईल. यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत शहरात २५ इलेक्ट्रिक बस सुरू होतील.- सिद्धार्थ शिरोळे, संचालक पीएमपी