पिंपरी : चिंचवड येथील उड्डाणपूलावर मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतला. त्यामध्ये टेम्पो जळून खाक झाला. ही घटना शनिवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. चिंचवडहून डांगे चौकाच्या दिशेने जात असलेल्या टेम्पोने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पोतुन उडी मारली. दुर्घटनेतून चालक बचावला. दुपारी झालेल्या अपघाताची माहिती मिळताच, अग्निशामक दलचे बंब आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वी वाहन जाळून खाक झाले होते. वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत चालक नाव शिवाजी सावंत (वय ५०. रा केळवडी ) किकवी ,खेड शिवापूर येथून माल घेऊन कंपनीला देण्यासाठी हे वाहन आले होते. पिंपरी येथ माळ खाली करून जात होते. चिंचवडगाव येथील उड्डाण पुलावर शनिवार दुपारी २ च्या सुमारास वाहनाला आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिंपरी अग्निशामक दलाचे एक वाहन व प्राधिकरण दलाचे एक अशा दोन वाहनांच्या साह्याने आग विझविण्यात आली. परंतु, तत्पूर्वी वाहन आगीत जळून खाक झाले अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. कोणालाही इजा झाली नाही. अग्निशामक दलाचे अशोक कानडे,मयुर कुंभार. चेतन माने विनेश वाटकरे. अरविंद गुळीक, प्रविण लांडगे सुधीर सैद या जवानांनी आग विझवली.
चिंचवडमध्ये अचानक पेट घेतलेले वाहन रस्त्यात जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:44 PM
चिंचवड येथील उड्डाणपूलावर मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतला. त्यामध्ये टेम्पो जळून खाक झाला.
ठळक मुद्देचालकाने प्रसंगावधान राखून टेम्पोतुन उडी मारल्यामुळे दुर्घटनेतून तो बचावला.आगीत अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान