कार्ला : संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा आईच्या मंदिराच्या कळसाची चोरी झाली़ या घटनेच्या निषेधार्थ वेहेरगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या घटनेला जबाबदार असणाºया एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.गेल्या तीन दिवसांपासून वेहेरगाव ग्रामस्थांसह, वेहेरगाव पायथा व गडावरील सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. देवीच्या मंदिराच्या कळसाचा छडा लावल्याशिवाय आम्ही गावातील एकही दुकानदार आपले दुकान उघडणार नाही, असे स्थानिकांनी ‘लोकमत’शी बोलतानासांगितले. गावातील सर्व नागरिक गडाच्या पायथ्याशी ठाण मांडून आहेत. एकवीरा आईच्या मंदिराचा कळस चोरीला जाणे ही जीवाला वेदना देणारी घटना आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले़
कळस चोरी : ‘एकवीरा’प्रकरणी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:45 AM