शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

महाराष्ट्र केसरीसाठी सुरेश नखाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 2:49 AM

६२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा : माती व गादी विभागातून निवड

पिंपरी : जालना येथे होणाऱ्या ६२ व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील कुस्तीपटूंची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी काळेवाडी, पिंपरी येथे घेण्यात आली. महाराष्ट्र केसरी खुल्या गटात माती विभागातून संतोष सुरेश नखाते याने शाह फैझल कुरेशी याला चितपट केले. तर गादी विभागात किशोर हिरामण नखाते याने प्रमोद मांडेकर याच्यावर विजय मिळवून आपला प्रवेश निश्चित केला. तसेच जानेवारी २०१९ ला मुंबईत होणाºया सीएम चषकसाठीही खेळाडूंची निवड करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान यांच्या वतीने पिंपरीतील काळेवाडी येथील तापकीर मळा येथे स्पर्धा घेण्यात आली. आखाडापूजन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या हस्ते झाले. पहिली कुस्ती शंकर जगताप यांच्या हस्ते लावण्यात आली. समारोप प्रसंगी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने जयराम ऊर्फ जयवंत बाबूराव नढे यांना जीवनगौरव पुरस्कार प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, आॅलिम्पिकवीर मारुती आडकर, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संयोजक व ‘Þग’ प्रभाग स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर, कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, सचिव धोंडिबा लांडगे, खजिनदार दिलीप बालवडकर, उपाध्यक्ष महाद्रंग वाघेरे, काळुराम कवितके, आयोजकनीलेश तापकीर, भारत केसरी विजय गावडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी माती विभागातून विजय मिळविलेला संतोष नखाते व गादी विभागातून विजयी झालेला किशोर नखाते हे पुण्यातील वारजे माळवाडी येथील सह्याद्री कुस्ती संकुल येथे सराव करतात.सीएम चषक निकाल :(५७ किलो गट) विशाल सोंडकर वि. वि. कुणाल जाधव. (६५ किलो गट) योगेश तापकीर वि. वि. परशुराम कॅम्प. (७४ किलो गट) निरंजन बालवडकर वि. वि. पृथ्वी भोईर. (८६ किलो गट) प्रसाद सस्ते वि. वि. कुणाल शेवाळे.(खुला गट) किशोर नखातेमहिला गट : (४८ किलो) प्रतीक्षा लांडगे वि. वि. सारिका माळी (५४ किलो) स्वप्नाली काळभोर वि. वि. आरती बांबे.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :कुमार गट४(४५ किलो) : जाधव वि. वि. प्रणव सस्ते, (४८ किलो) : संकेत माने वि. वि. केदार लांडगे, (५१ किलो) : यश कलापुरे वि. वि. कार्तिक लोखंडे, (५५ किलो) : महेश जाधव वि. वि. किरण माने, (६० किलो) : समर्थ गायकवाड वि. वि. विनायक वाजे, (६५ किलो) : सोहम लोंढे वि. वि. यश नखाते, (७१ किलो) : देवांग चिंचवडे वि. वि. सिद्धार्थ लांडे, (८० किलो) : शुभम चिंचवडे वि. वि. रोहित काटे, (९२ किलो) : निखिल जगताप वि. वि. अक्षय करपे, (११० किलो) : यश कलाटे वि. वि. प्रतिक चिंचवडेगादी विभाग खुला गट :४(५७ किलो) : विशाल सोंडकर वि. वि. कुणाल जाधव, (६१ किलो) : दीपक कलापुरे वि. वि. कुणाल कंद, (६५ किलो) : योगेश्वर तापकीर वि. वि. परशुराम कॅम्प, (७० किलो) : राजू हिप्परकर वि. वि. रवींद्र गोरड, (७४ किलो) : निरंजन बालवडकर वि. वि. पृथ्वी भोईर, (७९ किलो) : शुभम गवळी वि. वि. विवेक शेलार, (८६ किलो) : प्रसाद सस्ते वि. वि. कुणाल शेवाळे, (९२ किलो) : अजिंक्य कुदळे वि. वि. गणेश साळुंखे, (९७ किलो) : विपुल वाळुंज वि. वि. हर्षवर्धन माने, (८६ ते १२५ किलो) महाराष्ट्र केसरी गट : किशोर नखाते वि. वि. प्रमोद मांडेकर.माती विभाग खुला गट :४(५७ किलो) : विनायक नाईक वि. वि. जय वाळके, (६१ किलो) : चेतन कलापुरे वि. वि. परमेश्वर सोनकांबळे, (६५ किलो) : शेखर लोखंडे वि. वि. धीरज बोºहाडे, (७० किलो) : अविनाश माने वि. वि. वैभव बारणे, (७४ किलो) : पवन माने वि. वि. अक्षय आढाळे, (७९ किलो) : ऋषीकेश बालवडकर वि. वि. निखिल नलावडे, (८६ किलो) : सूरज नखाते वि. वि. अनुराग रासकर, (९२ किलो) : संकेत धाडगे वि. वि. कमरुद्दीन चौधरी, (९७ किलो) : कानिफनाथ काटे वि. वि. आदर्श नाणेकर, (८६ ते १२५ किलो) महाराष्ट्र केसरी गट : संतोष नखाते वि. वि. शाह फैझल कुरेशी. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtra Kesriमहाराष्ट्र केसरी