देहूरोड : तळेगाव दाभाडे एमआयडीसी, चाकण परिसरात अल्पवयीन मुलांचा वापर करून गुन्हा करणारा, तीन गुन्ह्यांत फरार असणारा, तसेच तीन दिवसांपूर्वी चाकण-तळेगाव राज्य महामार्गावरील भंडारा डोंगर पायथ्याला लूटमार करणाऱ्या जीटी बॉईज ग्रुपच्या म्होरक्याला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा लावून सोमवारी (दि. ५) रात्री उशिरा अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा, दुचाकी व दहा हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. वडगाव न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत (दि. ८) पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती देहूरोड पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांनी दिली.गणेश शंकर तांगडे (वय २८, रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या जीटी बॉईज गॅँगच्या म्होरक्याचे नाव आहे. पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा नऊ अल्पवयीन मुलांचा वापर करून जीटी बॉईज ग्रुपच्या माध्यमातून गुन्हे करीत आहे. परिसरात खंडणी, हप्ता वसुली, भाईगिरी, लूटमार ,दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न आदी इंदोरी, तळेगाव दाभाडे एमआयडीसी, चाकण आदी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील सहापैकी तीन गुन्ह्यांत तो फरार होता. गणेश हा मूळचा कुरक्डे ( ता. मुळशी जि. पुणे) येथील असून, इंदोरी येथे मामाच्या गावात राहत आहे. तो इंदोरीतील कॅडबरी कंपनीत नोकरीस होता.चाकण-तळेगाव राज्य महामार्गावरील इंदोरीजवळील भंडारा डोंगर पायथ्याला गस्तपथकावर असणारे तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, पोलीस पथकातील उपनिरीक्षक विक्रम पासलकर, नाईक सुधीर वाडिले, प्रशांत सोरटे, नितीन तारडे, सचिन काचोळे, एकनाथ कोकणे आदींनी गणेशला सापळा रचून सोमवारी रात्री अटक केली असून, त्याच्याकडून गावठी कट्टा, दुचाकी व दहा हजारांची रोकड जप्त केली आहे. गणेश तांगडे याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, तांगडेविरुद्ध हप्ता व खंडणीबाबत तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधून तक्रार द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांनी केले आहे. या वेळी तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके उपस्थित होते. नदीपात्रात मुलाचा मृतदेह सांगवी : रहाटणीलगत असलेल्या नदीपात्रात मुलाचा मृतदेह वाहत आल्याची घटना घडली़ याबाबत संतोष बलभीम शेरखान (रा़ रहाटणी) यांनी सांगवी पोलिसांना माहिती दिली.शेरखान यांचे रहाटणी नदीपात्राजवळ घर आहे़ ते नदीपात्राजवळ गेले असता त्यांना दुरुन काही तरी वाहत आल्याचे दिसून आले़ तो मृतदेह असल्याची खात्री होताच त्यांनी सांगवी पोलिसांना माहिती दिली़ दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला़ या मुलाचे वय साधारण ११ वर्ष आहे़ त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्यामुळे तो बुडाला असावा आणि नदीपात्रात या ठिकाणी वाहत आला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतदेह वायसीएममध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सराईतास सापळा लावून पकडले
By admin | Published: September 07, 2016 1:11 AM