शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

टाळ-मृदंगाने दुमदुमली अलंकापुरी

By admin | Published: July 08, 2015 2:20 AM

हाती भगव्या पताका, मुखी हरिनामाचा गजर व टाळ- मृदंगाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८५ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (९ जुलैै) होणार असून,

नितीन शिंदे आळंदी हाती भगव्या पताका, मुखी हरिनामाचा गजर व टाळ- मृदंगाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८५ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (९ जुलैै) होणार असून, हजारो वारकरी दाखल झाले आहेत. माऊलींच्या समाधी दर्शनासाठी वारकऱ्यांनी मंगळवारी गर्दी केली होती. ही रांग दीड किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. यंदाच्या पालखी सोहळ्यात ४२८ दिंड्या सहभागी होणार आहेत. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध दिंड्या दाखल होऊ लागल्या आहेत. आळंदीत दाखल झालेले वारकरी इंद्रायणीत मोठ्या भक्तिभावाने स्नान करीत होते. दर्शनासाठी भक्ती सोपान पुलावरून दर्शनबारीची सोय केली आहे. गर्दी वाढल्याने ही रांग सुमारे दीड किलोमीटर गेली होती. आबालवृद्ध, महिलांसह हजारो वारकरी या रांगेत तासन्तास उभे होते. वारकऱ्यांना पाणी व्यवस्थित व चांगले मिळावे, यासाठी नगर पालिकेच्या वतीने २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दररोज चार तास अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार आहे. आरोग्यासाठी तीन शिफ्टमध्ये कचरा उचलणे, औषध फवारणी व धूरफवारणी सातत्याने सुरू आहे. वारकऱ्यांना इंद्रायणीत स्नानासाठी पाणी कमी पडू नये यासाठी वडवळे धरणातून पाणी सोडले आहे, अशी माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली आहे.