पिंपरी: तडीपार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कोयता दाखवत आरोपीने धमकी दिली. आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट, अशी धमकी त्याने दिली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. पवनेश्वर मंदिराच्या मागील पुलावर, पिंपरीगाव येथे रविवारी (दि. ३) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शहाजी धायगुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी अतुल याच्याकडे कोयता मिळून आला. त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत त्याने झटापटी केली. आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट, असे म्हणून कोयता हातात घेऊन अतुल पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आज दिवस तुमचा आहे. उद्या काय करणार. तुम्हाला मीच पुरा पडणार, असे त्यावेळी अतुल म्हणाला. तसेच शिवीगाळ करून त्याने पोलिसांना धमकी दिली.
पोलिसांना जीवे मारण्याची धमकी; तडीपार आरोपीला बेड्याहर्षल उर्फ गबऱ्या रामदास पवार (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची कॉलर पकडून त्याने झटापटी केली. तसेच पोलीस कर्मचारी विकास रेड्डी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचारी रेड्डी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पवार याला अटक केली.