शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

नवरात्र उत्सवाच्या काळात काळजी घ्या, बेफिकीर राहू नका: आयुक्त श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 8:56 PM

गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

ठळक मुद्देनवरात्रात दांडिया, रावण दहनसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांना नाही परवानगी

पिंपरी: कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय अशी वाढ दिसली आली. त्यामुळे येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालून साधेपणाने मात्र आंतरिक भक्ती भावाने नवरात्र उत्सव साजरा करावा. दांडिया, रावण दहन सारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्ती भावाने आप-आपल्या घरातच देवीची पूजा करावी आणि निरोगी भवितव्याची प्रार्थना करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.  

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना आवाहन केले. आयुक्त हर्डीकर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहोत. यामुळे शहराने अपरिमित नुकसान पाहिले आहे. अनेक नागरिक कोरोनाग्रस्त झाले आणि अनेक बरे देखील झाले. मात्र, काही जणांना या साथीत जीव गमवावा लागला आहे. गेल्या सहा महिन्यात शहरातील नागरिकांनी पालिकेला खूप चांगले सहकार्य केले आहे. या कालावधीत आपण अनेक गोष्टी अनुभवायला शिकलो आहोत. '' ...........

 नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सवाची अंमलबजावणी नियंत्रित केली. विसर्जनासह विविध कार्यक्रम नियंत्रित केले. तरी देखील गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता. येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथ रोगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नयनाट झालेला नाही. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही, असेही हर्डीकर म्हणाले. ............... 

ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी हर्डीकर म्हणाले, ''कोरोना कधीही होऊ शकतो. अनेकांना अद्यापपर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. होऊ नये यासाठी प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे. विशेष अथवाने जेष्ठ नागरिक, ज्यांचे वय ६५वर्षांहून अधिक आहे. अन्य दुर्धर आजाराने पीडित आहेत. त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालावी. साधेपणाने मात्र, आंतरिक भक्ती भावाने नवरात्र उत्सव साजरा करावा. दांडिया, रावण दहन सारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्ती भावाने घरातच देवीची पूजा करावी. निरोगी भवितव्याची प्रार्थना करावी.''

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNavratriनवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्या