शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

Corona virus : पिंपरी चिंचवडकरांनो काळजी घ्या; प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडण्यास व फिरण्याला मनाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 3:34 PM

दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्दे१५ आॅगस्टपर्यंत नवीन आदेश लागु, पोलीस आयुक्तांच्या सुचना

पिंपरी : औद्योगिक शहरातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिका व आरोग्य प्रशासन सतत कार्यरत आहे. दुसरीकडे पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नियम अधिक कडक केले आहेत. १ ते १५ आॅगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील जमावबंदी, वाहतूक व संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. यासंबंधीचे अधिकृत आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काढले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अन्य कुठल्याही कारणांसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.   लॉकडाऊन आदेशाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप त्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळत नसल्याने नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिकांना व वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तसेच त्या परिसरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणासाठी नागरिकांना बाहेर पडता येणार नसल्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या आदेशातून कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, यांना वगळण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील पालिकेव्दारे चालविण्यात येणारी अथवा परवानगी दिलेली  ‘फिव्हर क्लिनिक’ वगळता अन्य बाह्य रुग्ण विभाग खासगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.  प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकिंग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत सुरु ठेवाव्यात. तसेच एटीएम केंद्रे पूर्ण वेळ कार्यान्वित ठेवावीत. या भागात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नागरिकांसाठी दुध, भाजीपाला, फळे, यांची विक्री सुरु राहणार आहे. यावेळी जमावबंदीचा आदेश सर्व नागरिकांना लागु राहणार आहे. त्यामुळे सार्वजनिक अथवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास थांबण्यास, चर्चा करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

* पोलीस प्रशासनाकडून लागु करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० नुसार आणि साथीचे रोग कायदा १८९७ तसेच प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. -

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकार