शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

थंडीत घ्या आरोग्याची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:07 AM

तज्ज्ञांचा सल्ला : रुग्णालयांमध्ये वाढतेय रुग्णांची संख्या

पिंपरी : शहरात सकाळी थंडी, दुपारी कडक उष्णता व रात्री पुन्हा थंडी, असे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले असल्याने शहरामधील रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वायसीएममधील वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. शंकर जाधव म्हणाले, सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यातच हवामान कोरडे असल्याने धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दमा असणाऱ्या रुग्णांचा त्रास वाढला आहे. थंडीमधील अतिसार, श्वसनविकार, थंडीताप, विषाणूजन्य ताप, दमा, कोरडा खोकला येणे असे रुग्ण सध्या आढळतात. इतर ऋतुंच्या तुलनेत थंडी हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत उत्तम आहे.या खाद्यपदार्थांमधून मिळेल प्रतिकार शक्तीबाजरी, ज्वारी, मका, जवळी, रागी (फिंगर मिलेट) ही काही सामान्य प्रकारचे अन्नधान्ये आहेत जी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.

गाजर, कांदे, पालक, हिरव्या बीन्स या जाती आहेत ज्यामुळे हिवाळ्यात निरोगी आणि उबदार राहण्यास मदत होते. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ‘सी’ सारख्या पौष्टिक स्रोतांचा समावेश आहे.

तुलसी (तुळस) आणि आले याचा चहामध्ये वापर केल्यास शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. तुलसीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-बायोटिक आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत जे शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. आपण केवळ आपल्या चहामध्ये नव्हे तर आपल्या सॅलड्स आणि डिप्समध्ये ही बहुमुखी औषधी वनस्पती जोडू शकता.थंडीच्या काळात पौष्टिक खाद्य, सुकामेवा, फळांचा आहार घेणे फायदेशीर ठरते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने व्यायाम करावा. विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्यता जास्त असल्याने रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असेल तर रुग्णांनी तोंडाला रुमाल बांधावा. थंडीच्या काळात हळद-दूध, कॉफी, तुळशीचा चहा यांचे सेवन करावे. शिळे अन्नपदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दही, लस्सी, थंडपेय टाळावेत. - डॉ. शंकर जाधव

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड