उर्से : मागील निवडणुकीत सत्तधारांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांचे ेकाय झाले हे सर्वांना माहीत आहे. आता मतदार सुजाण झाला असून, त्यामुळे या निवडणुकीत तुम्हाला वेठीस धरणाऱ्यांना धडा शिकवा, असे मत शिवणे, पिंपळखुटे व बेबडोहोळ येथील मतदारांच्या गाठीभेटी घेताना कॉँग्रेसचे सोमाटणे गणाचे उमेदवार बाळकृष्ण पोटवडे यांनी व्यक्त केले. पोटवडे म्हणाले, ‘‘सोमाटणे गणातील शिवणे, पिंपळखुटे व बेबडोहोळ या गावांचा हवा तसा विकास झालेला नाही. गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. सत्ताधारी १५ वर्षे आश्वासनेच देत आल्याने हे प्रश्न सुटलेले नाहीत. या गावातील विकास तर झालाच नाही, मात्र विकासाला गतीही देता आली नाही. असे अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत. विकासाचे व्हीजन समोर ठेवून मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन पोटवडे यांनी केले. त्यांनी शिवणे, पिंपळखुटे व बेबडोहोळमधील तरुण, वयोवृद्ध यासह ठाकर वस्तीवरील नागरिक, शेतकरी महिलांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
वेठीस धरणाऱ्यांना धडा शिकवा : बाळकृष्ण पोटवडे
By admin | Published: February 15, 2017 2:03 AM