पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विशेष समित्यांच्या सभापतींची निवड सोमवारी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेत करण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या विशेष सभेत विधी समिती सभापतिपदी नंदा ताकवणे, महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी गीता मंचरकर, शहर सुधारणा समिती सभापतिपदी स्वाती साने, तर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी समीर मासुळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी अभिषेक कृष्णा या नवनियुक्त सर्व समिती सभापतींचे अभिनंदन करण्यात आले. पीठासन अधिकारी अभिषेक कृष्णा, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, राष्ट्रवादी कॉँग्रेसप्रणीत अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी माजी महापौर आर. एस. कुमार, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, नीलेश पांढारकर, गोरक्ष लोखंडे, वसंत लोंढे, सुजित पाटील, जावेद शेख, जितेंद्र ननावरे, अॅड. नितीन लांडगे, नगरसदस्या भारती फरांदे, नीता पाडाळे, चारुशीला कुटे, वैशाली जवळकर, सुमन नेटके, शैलजा शितोळे, सुभद्रा ठोंबरे, पौर्णिमा सोनवणे, अमिना पानसरे, साधना जाधव, सुजाता पालांडे, आरती चोंधे, संगीता पवार, सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, दत्तात्रय फुंदे, नगरसचिव उल्हास जगताप, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, कायदा अधिकारी सर्जेराव लावंड आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सभापतिपदी ताकवणे, मंचरकर, साने, मासुळकर
By admin | Published: September 15, 2015 4:20 AM