शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर टेम्पोत बलात्कार; चालक, क्लिनर फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:04 AM

२९ वर्षीय महिलेची आळंदी पोलिसांकडे फिर्याद; टेम्पो चालक व क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पेरणे फाटा येथे सोडण्यास घेऊन जातो, असे सांगून टेम्पो चालकाने एका महिलेला पिंपरी चिंचवडला आणून तिच्यावर टेम्पोमध्येच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदी ते पिंपरी चिंचवड परिसरात १० मार्चला रात्री अकरा ते ११ मार्च रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय महिलेनं आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक व क्लिनर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आळंदीतल्या एका महिलेला टेम्पो चालकाने पेरणे फाटा येथे घेऊन जातो, असे सांगून गाडीत बसवून घेतले. त्यानंतर त्याने टेम्पो पेरणेफाटा येथे घेऊन न जाता पिंपरी चिंचवडच्या दिशेने नेला. त्यानंतर टेम्पोमध्येच तिच्यावर चालक व क्लिनर यांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी या महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली व कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडला सोडून ते पसार झाले. या घटनेनंतर ही महिला परत आळंदी येथे आली. तिने पोलिसांकडे धाव घेतली. बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लोहेकर अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कार