पिंपरी : महापालिकेतील उत्पन्न वाढीकडे सत्ताधाºयांनी लक्ष दिले असून फ्लेक्सचे उत्पन्न वाढविण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभाग सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. स्थायी समितीच्या आदेशानंतर अनधिकृत फ्लेक्सधारकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. दहा हजार रुपये दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत.महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आकाशचिन्ह परवाना विभागाचे उत्पन्न वाढ आणि अनधिकृत फ्लेक्सवर चर्चा मागील आठवड्यात अधिकृत फ्लेक्स किती आणि अनधिकृत फ्लेक्स किती या विषयीची माहिती मागीतली होती. आठवडाभरानंतर झालेल्या सभेतही प्रशासनास माहिती देता आली नाही. याविषयी माहिती देताना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘शहरात १८५० फलक आहेत. त्यात महापालिकेचे २७ फ्लेक्स आहेत. शहरातील विविध ठिकाणी असणाºया रस्त्यावरील फ्लेक्स कोणाच्या जागेत आहेत, त्यासाठी परवानगी घेतली आहे का? फ्लेक्स अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत. किती फ्लेक्सधारक महापालिकेचे शुल्क भरतात किंवा चुकवितात. याबाबत प्रशासनाकडे माहिती मागविली होती. मात्र, याची ठोस माहिती उपलब्ध नाही.
विनापरवाना फ्लेक्सला दहा हजारांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:49 AM