शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
3
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
4
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
5
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
6
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
7
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
8
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
9
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
10
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
11
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
12
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
13
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
14
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
15
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
16
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
17
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
18
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

भरदिवसा गोंधळ घालणाऱ्या किटक टोळीची धिंड; मावळातील गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलीस आक्रमक

By नारायण बडगुजर | Published: May 28, 2023 5:45 PM

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, पोलीस आयुक्तांची सूचना

पिंपरी : भरदिवसा गोंधळ घालत दहशत निर्माण  करणाऱ्या किटक टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई करून टोळीतील गुन्हेगारांची तळेगाव दाभाडे येथे धिंड काढली. त्यामुळे मावळातील गुन्हेगारांची तंतरली आहे.    

किटक उर्फ जय प्रवीण भालेराव (वय १९), वैभव राजाराम विटे (२५, दोघेही रा. तळेगाव दाभाडे), विशाल शिवाजी गुंजाळ (२०, रा. वराळे), प्रदीप वाघमारे (२०, रा. वडगाव), रुतिक मेटकरी (२०, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किटक याने साथीदारांसह तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा मुलींची नावे घेऊन गल्लीमध्ये आरडाओरडा केला. फिर्यादी महिलेला मारहाण करून विनयभंग केला. महिलेच्या दीराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून दहशत केली. 

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा माग काढून अटक केली. गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले. आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इतरांना यातून योग्य संदेश देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.     टोळीतील सदस्यांवर गंभीर गुन्हे

किटक टोळीचा प्रमुख असलेला किटक भालेराव याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरुपाचे १० गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडा, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करून धमकी देणे व दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. तसेच आरोपी वैभव विटे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सात तर चाकण पोलिस ठाण्यात एक असे आठ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी विशाल गुंजाळ, प्रदीप वाघमारे आणि रुतिक मेटकरी यांच्यासह विधीसंघर्षित बालकाच्या विरोधात देखील विविध गुन्हे दाखल आहेत.  

पोलिस आयुक्त ‘ॲक्शन मोड’मध्ये

भर दिवसा गुंडगिरीचा मावळ पॅटर्न मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे आक्रमक झाले आहेत. त्यासाठी त्यांनी गुन्हेगारांच्या आणि त्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय करू नका, अशा सूचना आयुक्त चौबे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकcommissionerआयुक्त