पिंपरी : घराचा कडीकोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी निगडीत एका ठिकाणी ५ लाख ९७ हजार रुपए किंमतीचा ऐवज चोरून नेला. तर वाकड परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. थेरगाव, वाकड येथून ३ लाख २६ हजारांचे दागिने लंपास करण्यात आले. तर वाकड पोलिसांच्या हद्दीत पुनावळे येथे ७० हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी पळवुन नेला. तिन्ही घरफोडींच्या घटनेत एकुण ९ लाख ९३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरीच्या घटना सोमवारी रात्री घडल्या आहेत.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर क्रमांक २६ येथील निगडी, प्राधिकरण परिसरातील सदनिका क्रमांक ३७ मध्ये चोरीची घटना घडल्याची फिर्याद डी जेसुबालन (वय ३४) यांनी निडी पोलिसांकडे दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशीच घरफोडीची घटना वाकड हद्दीत थेरगाव येथील आशिष प्लाझा इमारतीत घडली आहे. प्राची निलेश तिकोणे यांनी या प्रकरणी वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल कली आहे. आत चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून ३ लाख २६ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड हद्दीत पुनावळेतील हिमालया पार्क या इमारतीतील सदनिकेत शिरून चोरट्यांनी ७० हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम पळवुन नेले आहे. लिलाधर शरद राणे (वय ३६) यांनी चोरी झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.