भोसरी : मौजमजेसाठी चोरी करणा-या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ गुन्हे उघडकीस आले असून, साडेसहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुरेश कलिंगरे (वय ३०), नरेश शिवराम गायकवाड (दोघेही रा. मोशी), राहुल पीतांबर कांबळे (वय २८, रा. हिंजवडी) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाहन चोरणारे काही आरोपी भोसरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विपुल जाधव यांना मिळाली. त्यानुसार कलिंगरे आणि गायकवाड यांना संशयावरून ताब्यात घेतले. चौकशी केली असता आरोपींकडून चोरीच्या सात दुचाकी, एक तीनचाकी, चारचाकी, नऊ मोबाईल असा एकूण सहा लाख ६६ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.त्याचप्रमाणे चोरीच्या दुचाकी विकत घेणा-या प्रशांत भिसे (रा. चिंबळी फाटा), रुपेश अंबादास खरगे (वय २६, रा. मोशी) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीतआहेत.बॅट-या चोरणारे गजाआड-सांगवी परिसरातील एटीएम केंद्रातील बॅट-या चोरणा-या चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तीन लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हरिश्चंद्र मेश्राम (वय ३०, रा. लांडे बिल्डिंग, कासारवाडी), शौकत मकबूल शेख (वय ३८, रा. गुलमोहर कॉलनी, पिंपळे गुरव), सतीश वानखेडे (वय ३२, रा. वैद वस्ती, पिंपळे गुरव) आणि राजेश ऊर्फ सरदार ऊर्फ दाजी शिवराम तायडे (वय ३५, रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.पोलिसांनी सापळा रचून सूरज मेश्राम व शौकत शेख या दोघांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांच्या सोबत सतीश वानखेडे आणि राजेश तायडे हे दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली. चोरट्यांकडून १ लाख ९२ हजार रुपये किमतीच्या ३० बॅटºया, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १ वाहन, अंदाजे ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ३ लाख ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनीजप्त केला आहे. सांगवी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.मोरवाडीत तरूणाची आत्महत्या-मोरवाडी, पिंपरी येथे फैजान अनिस पठाण (रा. मोरवाडी, पिंपरी) या १७ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजान पठाण हा गॅरेजमध्ये काम करीत होता. राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला कापडाच्या साहाय्याने गळफास घेतला. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यातदेण्यात आला. नैराश्यापोटी त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून,पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.पोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी लंपास-पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविल्याची घटना थेरगाव येथे घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस आरोपींच्या मागावर गेले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघना डबळी व कुलकर्णी यांनी फिर्याद दाखल केली आहे. या दोघींच्या सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून काढून घेतल्या.‘‘आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गळ्यातील सोने चोरीला जाऊ शकते, तुम्ही दागिने तुमच्या पर्समध्ये ठेवा, असे बोलण्यात गुंतवून शिताफिने दागिने घेऊन ते पसार झाले.
मौजमजेसाठी चोरी करणारे चोरटे जेरबंद, अठरा गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:59 AM