ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही; संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:45 PM2024-11-17T15:45:28+5:302024-11-17T15:46:18+5:30

आमदार होण्याची स्वप्ने विस्थापित लोकांनी बघायची नाहीत का? प्रस्थापितांकडे पैसा असला तरी विस्थापितांकडे संस्कार आहेत

There is no telling when those parties will unite; The statement of Sambhaji Raj created excitement in the political circle | ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही; संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही; संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पिंपरी : पिंपरीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. सध्या राजकारणात पक्ष फुटून नवीन पक्ष तयार झाले आहेत. ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही असा दावा त्यांनी केला आहे. परिवर्तन महाशक्तीचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरीचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ व चिंचवडचे उमेदवार मारुती भापकर यांच्या प्रचारार्थ पिंपरीत जाहीर सभा झाली. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, प्रस्थापित लोकांनी तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला आहे. आमदार होण्याची स्वप्ने विस्थापित लोकांनी बघायची नाहीत का ? त्यांना आमदार होता यावे यासाठीच स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. प्रस्थापितांकडे पैसा असला तरी विस्थापितांकडे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे उभे राहा. पिंपरी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेले दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही. येथील आमदार विकासावर बोलत नाहीत. तुमचे कोणतेही प्रश्न ते सोडवत नाहीत. याला जबाबदार तुम्ही आहात. कारण तुम्ही आवाज उठवत नाही. त्यामुळे आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. नोटा वाटून मत विकत घेणाऱ्या नाही तर सुसंस्कृत राजकारण करणाऱ्यांच्या मागे उभे राहा. बाळासाहेब ओव्हाळ आणि मारुती भापकरांना निवडून द्या.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरीही आज दलित वस्त्यांची अवस्था वाईट आहे. पिंपरीमध्ये प्रस्थापित आमदारांनी इतकी वर्षे काय केले ? ते विकासावर का बोलत नाही ? पिंपरी-चिंचवड सर्वांत श्रीमंत महापालिका असताना तिचा वापर फक्त टीडीआर घोटाळा करण्यासाठी केला जात आहे. दलित बांधवांना चांगली घरे देण्यासाठी ‘एसआरए’ प्रकल्प का राबवला जात नाही ?, असा सवाल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी केला.

Web Title: There is no telling when those parties will unite; The statement of Sambhaji Raj created excitement in the political circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.