लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रतिकूल परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा, हे कृष्णनीती आम्हाला शिकवते! असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘युगंधर भगवान श्रीकृष्ण’ या विषयावरील तृतीय पुष्प गुंफताना प्रा. बानगुडे-पाटील बोलत होते. उद्योजक भगवान पठारे अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, सुभाष पागळे, अरविंद वाडकर, अशोक कामेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संयोजक मारुती भापकर यांनी स्वागत केले.व्याख्यानापूर्वी, कवी अशोक कोठारी, प्रदीप गांधलीकर, प्रा. बी. आर. माडगूळकर यांनी कवितावाचन केले; तसेच बाल व्याख्याता शुभम सुतार याने उत्स्फूर्तपणे छत्रपती संभाजींवर छोटेसे व्याख्यान दिले.प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले की, ‘‘भारतीय अध्यात्मात श्रीकृष्णाला पूर्ण अवतार मानले जाते. बालकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण याबरोबरच रसेश्वर, ज्ञानेश्वर, योगेश्वर, तत्त्वज्ञ अशा अनेक रूपात श्रीकृष्ण आपल्यापुढे येतो कृष्ण चरित्रात ‘गोकूळ’, ‘गोवर्धन’, ‘गोप’ , ‘गोपी’ अशा अनेक शब्दांतून ‘गो’ या अक्षराचा वापर केला जातो. ‘गो’ म्हणजे इंद्रियांचा समूह होय. दिगंबर बालुरे, राहुल साळुंखे, नवनाथ सलगर यांनी सहकार्य केले.
प्रतिकूलतेतून मार्गासाठी कृष्णनीती गरजेची
By admin | Published: May 12, 2017 5:03 AM