भोसरीचा नियोजनबद्ध विकास झाला नाही, म्हणून...! गव्हाणे यांनी सांगितलं शरद पवार गटात जाण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:55 PM2024-07-17T12:55:58+5:302024-07-17T12:56:24+5:30

भाजपची सत्ता असताना विकासाच्या बाबतीत पिंपरी चिंचवड, भोसरी अधोगतीकडे जाताना दिसून आले

There was no planned development of Bhosari ajit Gavane told the reason for joining Sharad Pawar group | भोसरीचा नियोजनबद्ध विकास झाला नाही, म्हणून...! गव्हाणे यांनी सांगितलं शरद पवार गटात जाण्याचं कारण

भोसरीचा नियोजनबद्ध विकास झाला नाही, म्हणून...! गव्हाणे यांनी सांगितलं शरद पवार गटात जाण्याचं कारण

पुणे : अजित गव्हाणे यांच्या सह आजी माजी २५ नगरसेवक पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश सकाळी साडे अकरा वाजता मोदी बाग पुणे येथे प्रवेश केला. यावेळी शहरातील आजी माजी महापौर व नगरसेवक हजर होते. यावेळी गव्हाणे यांनी शरद पवार गटात जाण्यामागचे कारण सांगितलं आहे. 
 
गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये २०१७ नंतर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. त्याअगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. भाजपच्या सत्तेनंतर महापालिका आणि शहर विकासाच्या बाबतीत अधोगतीकडे जाताना दिसून आले. तर भोसरी विधानसभेकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होऊ लागले. एकहाती सत्ता अजितदादांकडे नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली. तसेच आमच्या भोसरी विधानसभेच्या बाबतीत दुर्लक्ष झाले. आता पुढची ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून विकास करणे गरजेचे आहे. परंतु तसे न होता नुसते पैसे खर्च झाले. पण विकास आम्हाला दिसला नाही. मी आता विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या काही वर्षांपासून मी विधानसभेच्या प्रयत्नात होतो. आता भोसरीचा विकास करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

पुरोगामी विचारांची कास धरून काम करा 

आज पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडून स्वागत करण्यात आले. पुरोगामी विचारांची कास धरून काम करणाऱ्या प्रत्येकाचे  स्वागत आहे. संघर्ष करून आपले विचार आपल्याला टिकवायचे आहे. त्या दृष्टीने काम करा असे मार्गदर्शन यावेळी शरद पवार यांनी केले.

- कोणा कोणाचा पक्ष प्रवेश 

 माजी महापौर हणमंतराव भोसले, वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता  साने यांचे पुत्र यश साने, माजी नगरसेवक संजय नेवाळे, वसंत बोराटे, विनया तापकीर,  माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर,  गीता मंचरकर, संजय वाबळे, वैशाली उबाळे, शुभांगी बोराडे, अनुराधा गोफने, घनश्याम खेडेकर, तानाजी खाडे, शशिकीरण गवळी, विजया तापकीर, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे,  विशाल आहेर, युवराज पवार,  कामगार आघाडीचे विशाल आहेर, नंदूतात्या शिंदे,  शरद भालेकर.

Web Title: There was no planned development of Bhosari ajit Gavane told the reason for joining Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.