यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांनी संशयितरीत्या चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले आणि यातून सुगावा लागलाय एका दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा.पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावांमधून चोरी केलेल्या तब्बल १९ दुचाकी यवत पोलिसांनी संबंधित दुचाकी चोरांकडून हस्तगत केल्या आहेत, तर अजून २ दुचाकी त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता आहे. आरोपी हर्षवर्धन गौतम घोडके (वय २३), पद्मराज उर्फ पद्म अर्जुन ढोणे (वय १९), जीवन नाना गिरगुले (वय २०) व किरण गंगावने (वय २१) यांना अटक केली. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस नाईक संदीप कदम, दीपक पालखे, रमेश कदम, गणेश झरेकर, हेमंत कुंजीर, संपत खबाले, सुधीर काळे, विनोद रासकर, विशाल गजरे यांनी आरोपींकडे सखोल तपास केला असता आरोपींनी ठिकठिकाणी चोऱ्या केलेल्या दुचाकींची माहिती मिळाली.यवत पोलिसांच्या पथकाने आरोपींना घेऊन कर्जत तालुक्यातील मिराजगाव पोलीस चौकीमध्ये जाऊन परिसरातील दुचाकी हस्तगत केल्या.आरोपींनी बारामती, कर्जत, मिरजगाव, राशीन, दौंड, अहमदनगर, बार्शी, सोलापूर, श्रीगोंदा आदी परिसरात दुचाकींची चोरी केली होती.
अन् छडा लागला दुचाकी चोर टोळीचा
By admin | Published: October 15, 2016 5:50 AM