पिंपरी : सुप्रिया सुळे यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो. खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते. असे म्हणत अजित पवारांनीसुप्रिया सुळेंच हे उपोषण स्टंटबाजी असल्याचे अप्रत्यक्षरीत्या म्हटले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील भोर येथील बनेश्वर च्या सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे पिंपरी- चिंचवड मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, भोर मधील बानेश्वर चा रस्ता केवळ सहाशे मीटर आहे. दर मंगळवारी देवगिरी येथे राष्ट्रवादीचे आमदार, सर्व मंत्री, प्रांताध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक होते. बैठकीत आमदार शंकर मांडेकर यांनी बनेश्वर च्या रस्त्याचा प्रश्न मांडला होता. मी इथला पालकमंत्री आहे. रास्ता सहाशे मीटरचा आहे. फार मोठा नाही. मांडेकर यांचा तो मतदारसंघ आहे. हा रस्ता पीएमआरडीए, जिल्हा परिषद किंवा, जिल्हा वार्षिकी योजने मधून आपण करू असे सांगितले. कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. तो रस्ता मी करणार आहे. अस अजित पवार यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंची ही स्टंटबाजी आहे का? पत्रकारांच्या या प्रश्नावर अजित पवारांनी नो कॉमेंट्स असे उत्तर देत...हा केवळ ६०० मीटर च्या रस्त्याचा होता. आमदार आणि खासदार यांना पाच कोटींचा निधी मिळतो. रास्ता करायचा म्हटले तर या निधीतून करता येतो. एका मिनिटात रास्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात, असेही अजित पवार म्हणाले.