शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सराईत चोरटा अजित व्यंकप्पा पवार उर्फ लिंग्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 1:39 PM

१२ लाख ७८ हजार ४५० रुपये किमतीचे ३३, तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत

पिंपरी : बंद घरांच्या खिडकीचे गज कापून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून १२ लाख ७८ हजार ४५० रुपये किमतीचे ३३, तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार (वय ३०, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना घरफोडी करणाऱ्या आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह औरंगाबाद येथे जाऊन वाळूज परिसरातून वाळूज पोलिसांच्या मदतीने आरोपी पवार याला ताब्यात घेतले. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला घरफोडीचा गुन्हा त्याने त्याच्या इतर तीन साथीदारांसह केला असल्याचे आरोपी पवार याने कबूल केले आहे. आरोपी पवार याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच हिंजवडी, देहूरोड, भोसरी, चाकण व आळंदी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी पवार हा पाहिजे आरोपी आहे.

चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला बेड्याआरोपी पवार याने घरफोडी करून चोरी केलेले दागिने तो एका व्यापाऱ्याकडे विक्री करीत होता. गुन्ह्यातील मुद्देमाल त्याने एका व्यापाऱ्याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संदीप अंकुश केत (रा. सम्राट चौक, अक्कलकोट, जि. सोलापूर), या व्यापाऱ्याला अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

वेशांतर करून चार दिवस पोलिसांचा वॉचआरोपी पवार हा औरंगाबाद येथील वाळूज परिसरात त्याच्या नातेवाईकांकडे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक वाळूज परिसरात गेले. तेथे चार दिवस वेशांतर करून आरोपी पवार याच्यावर वॉच ठेवून त्याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक प्रसन्ना जऱ्हाड, पोलीस कर्मचारी धनराज किरणाळे, दत्तात्रय बनसुडे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, सावन राठोड, राजेंद्र साळुंखे, मयूर वाडकर, नागेश माळी, संदीप ठाकरे, शामसुंदर गुट्टे, नितीन बहिरट, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, भरत माने, गोपाळ ब्रमांदे, गणेश महाडिक, सचिन मोरे, निलम शिवथरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरी