पिंपरी : मोबाइल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मदत करणारी एक महिला, एक अल्पवयीन मुलगा यांची कसून चौकशी केली जात आहे. आरेपींकडून चोरीचे ११० मोबाइल, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत दिली.मोबाइल चोरांना पकडल्याची माहिती देताना आयुक्त पद्मनाभन म्हणाले, लखन ऊर्फ बबल्या अवधूत शर्मा (वय १८, दळवीनगर), लहू ऊर्फ लाल्या अंकुश भिसे (वय १८, दळवीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी लखनच्या आईने चोरीचे मोबाइल लपवून ठेवण्यास मदत केली होती, त्यामुळे याप्रकरणी तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका अल्पवयीन आरोपीचाही चोरी प्रकरणात सहभाग आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, रेलविहार कॉलनीजवळ, बिजलीनगर येथे एका पादचाºयाचा मोबाइल चोरट्याने हिसकावला. पादचाºयाने पोलिसांना कळविले. चिंचवड पोलीस ठाण्यातील कर्मचारी गोविंद डोके, राहुल मिसाळ, पंकज भदाने, अमोल माने यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. फिर्यादीकडून चोरट्यांचे वर्णन माहिती करून घेतल्यानंतर पांढारकर इमारतीजवळ त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले.पत्रकार परिषदेस अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडल एकच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे तसेच तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पांडुरंग जाधव, राजेंद्र शिरसाट, स्वप्निल शेलार, हृषीकेश पाटील, विजय आखाडे, गोविंद डोके, पंकज भदाणे, सचिन वर्णेकर, विजय बोडखे, सुधीर वाळुंज आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलीस कर्मचाºयांची दखल घेऊन त्यांना बक्षीस देण्यात येईल, असे आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले़>पिंपरी, चिंचवड, निगडी परिसरातून या चोरट्यांनी मोबाइल चोरले आहेत. ११० मोबाइलची किंमत सुमारे १० लाख ६२ हजार इतकी आहे. तर त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी दीड लाख रुपये किमतीच्या आहेत. ११० मोबाइल पैकी ३० मोबाइलचे मालक संपर्कात आले आहेत. उर्वरित मोबाइलच्या मालकांचा शोध घेतला जात आहे.
चोरटे जेरबंद; ११० मोबाइल केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:55 AM