पिंपरी : वाहनचोरीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यात दुचाकीचोरीचे प्रमाण जास्त असले तरी अवजड वाहने चोरीला जाण्याचे प्रकारही घडत आहेत. शहरातून एका ट्रकसह आठ दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी रविवारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. अवजड वाहनेही चोरीला जात असल्याने वाहनधारक धास्तावले आहेत.
स्टिफन सॅमसन आल्हाट (वय २०, रा. घरकुल, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची ३५ हजारांची दुचाकी १९ जानेवारी रोजी पिंपरी येथून चोरट्यांनी चोरून नेली. संजय सॅम्युअल पीटर्स (वय ५५, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची २५ हजारांची दुचाकी चोरट्यांनी आकुर्डी येथून चोरून नेली. मुकेशकुमार पंचानंद सिंग (वय ३६, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची आठ हजारांची दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.
सुनील चंद्रकांत लंके (वय ३०, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची ३० हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. बिकलप चंद्र भोमीक (वय ६८, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची २५ हजारांची दुचाकी चोरट्यांनी खराळवाडी, पिंपरी येथील पोस्ट ऑफिस समोरून चोरून नेली. सच्चीदानंद कपिलदेव गौड (वय ३२, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गौड यांची पाच हजारांची दुचाकी चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली.
विनायक शिवानंद शिरोळ (वय २३, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची ३० हजारांची दुचाकी घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली. जितेंद्रदया शंकर पांडे (वय ३३, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची १० हजारांची दुचाकी घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.
पाच लाखांच्या ट्रकची चोरीअक्षय सुनील मोहिते (वय २६, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांचा पाच लाख रुपये किमतीचा ट्रक शनिवारी (दि. ३०) रात्री नऊच्या सुमारास दिघी येथील किंग्डम सोसायटी समोरील सर्व्हिस रोडवर पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.